ऑनलाईन स्पर्धा आणि हॅकिंग

30

इथिकल हॅकिंग वगळता आजवर इल्लीगल (illigal) हॅकिंगच्या जाळ्यात अनेक गोष्टी अडकल्या जसं की लोकांचा पर्सनल डेटा चोरी करणे तो परस्पर विकणे, मोबाईल लॅपटॉप किंवा बँक अकाऊंट हॅक होणे त्यातले पैसे चोरीला जाणे. परंतु ह्या टाळेबंदी च्या काळात हॅकिंगच्या प्रकाराने चक्क ऑनलाईन स्पर्धेलाच हात घातला..!

कोरोना आणि टाळेबंदी च्या कठीण काळात अनेक संस्थांनी विद्यार्थी तसेच अनेक हरहुन्नरी व्यक्तींसाठी स्पर्धेसाठी ऑनलाइन प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देत अनेक स्पर्धांचे आयोजन केले ही चांगली गोष्ट असली तरीही ह्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या स्पर्धेतून एका नवीन भ्रष्टाचाराचा जन्म झाला…!

याचे कारण म्हणजे स्पर्धेच्या निकालाचे निकष हे संपूर्णतः परीक्षकांवर निर्धारित नसून बऱ्याच अंशी व्हिडिओ साठी आलेले लाइक्स आणि व्ह्यूज यावर अवलंबून असल्याने गुणवत्ते खेरीज केवळ लाईक्स आणि व्ह्यूज वाढवण्याची स्पर्धा सुरू झाली, आणि त्यातूनच चॅनल हॅकिंग सारखा प्रकार मोठ्या प्रमाणात होऊ लागला..!

गुणवत्ता चांगली असलेल्या एखाद्या स्पर्धकाचे लाईक्स कमी करणे किंवा स्लो डाऊन करणे, एखाद्या स्पर्धकांचे लाइक्स आणि व्ह्यूज वाढवणे अथवा लाईक्स आण व्ह्यूज विकत घेणे असे प्रकार हॅकिंग च्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर होऊ लागलेत.बऱ्याच स्पर्धेच्या पत्रकात स्पर्धेचे अटी व नियम लिखित स्वरूपात नाहीत जे की असण बंधनकारक आहे. त्यातूनही हा हॅकिंगचा प्रकार वाढीस लागतोय. यामुळेच अनेक रियालिटी शोजला किंवा इतर अनेक गोष्टींसाठी जी ऑनलाइन वोटिंग होते ती कितपत पारदर्शक आहे यावर साशंकता निर्माण होते.

पण मुळात चुकीच्या पद्धतीने व्ह्यूज आणि लाइक्स वाढवून मिळवलेल यश टिकेल काय? ज्यावेळी ऑफलाईन किंवा खऱ्या स्पर्धेला सामोरे जाण्याची वेळ येईल तेंव्हा हे यश पुन्हा मिळवता येईल काय? याचा विचार होणं गरजेचं आहे.
स्पर्धा ही स्पर्धे सारखीच घेता यायला हवी आणि ती निकोप असायला हवी त्याला युद्धाचं स्वरूप देता कमा नये. कारण युद्ध म्हंटल की डावपेच आले गनिमी कावे आले आणि साम-दाम-दंड-भेद या नीतीनं केवळ जिंकण आलं..!
परंतु केवळ यशासाठी प्रत्येकाचा अट्टाहास नीतिमूल्य विसरायला लावतोय. खरंतर अपयश अशी संकल्पनाच अस्तित्वात नाही..!

यशाचा अभाव म्हणजे अपयश नाही..!
एखाद्या गोष्टीसाठी आपण जेव्हा प्रयत्न करतो तेव्हा एक तर आपण यशस्वी होतो किंवा अनुभव संपन्न होतो. जेव्हा प्रत्येकाच्या मनात स्पर्धा आणि यशासाठी च्या ह्या संकल्पना रुजवल्या जातील त्यावेळेस कदाचित हॅकिंग किंवा यशासाठीचे इतर तत्सम प्रकाराने चुकीचे मार्ग अवलंबण थांबवलं जाईल.

उदाहरणादाखल सांगायचं झालं तर 2 ऑक्टोबर गांधी जयंती निमित्त घेण्यात आलेल्या गांधी विचारधारेवर आधारित ऑनलाइन स्पर्धेमध्ये पत्रकातील नियम व अटींमध्ये निकालातील निकषा बाबतची कुठलीही स्पष्टता नसावी तसेच त्यात हॅकिंग सारखे प्रकार व्हावेत ही अतिशय निंदनीय बाब आहे. खरंच आज गांधीजी जर असते तर कदाचित हॅकिंग सारखे प्रकार त्यांनी थांबवले असते…! आणि अशाप्रकारे इल्लिगल (illigal) हॅकिंग सारख्या भ्रष्टाचाराचं बाळकडूच जेंव्हा स्पर्धा स्वरूपातून मुलांना पाजलं जाईल तेंव्हा भारत भ्रष्टाचार मुक्त होण्याची अपेक्षा करणं कितपत योग्य..?

✒️लेखिका:-सौ. सायली कस्तुरे -बोर्डे.
Dip. E&C . B.E. E&Tc.

▪️संकलन:-अंगद दराडे(बीड,जिल्हा प्रतिनिधी)मो:-8668682620