✒️अंगद दराडे(विशेष प्रतिनिधी)मो:-8668682620

धुळे(दि.13ऑक्टोबर):-लुपिन फॉउंडेशन धुळे द्वारा संचलित रेडिओ पांझरा Fm. 90.4 आणि युनिसेफ महाराष्ट्र सेंटर फॉर सोशल बेहेवीअर चेंज कम्मुनिकेशन द्वारा आयोजित”Life and times of the Covid-19″उपक्रमअंतर्गत चार गटात निबंध व चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
निबंध स्पर्धेत तरुण वर्गाच्या गटात कु.रुपाली कन्हैयालाल चौधरी पिंपळनेर(धुळे)ह्या विद्यार्थीनीला प्रथम क्रमांकचे सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते देऊन तिचा गौरव करण्यात आला.

तिने “कौटुंबिक हिंसाचार व अत्याचार”ह्या विषयावर निबंध सादर केला.तिला तिचे पितृतुल्य असणारे गुरुवर्य प्रा.डी.टी.पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
यावेळी रेडिओ पांझरा Fm. 90.4 चे केंद्र समन्वयक राहुल ठाकरे, आर.जे.जयवंत कापडे,व प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.डी.टी.पाटील व प्रा.एच.डी.पाटील व पालकवर्ग उपस्थित होता.यावेळी सोशल डिस्टन्स चे पालन करत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार राहुल ठाकरे यांनी केले.प्रा.डी.टी.पाटील व प्रा.एच.डी.पाटील यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.यावेळी प्रा. डी.टी.पाटील यांनी बोलताना, मुलांनो नेहमी अश्या स्पर्धामधे सहभाग घेत राहा.काहीही मार्गदर्शन लागले तर आम्ही तुमच्या पाठीशी आहोत.प्रयत्न करत राहा.यश नक्की मिळेल.असे प्रेरणादायी वक्तव्य केले . व केंद्र समन्व्यक राहुल ठाकरे आर.जे.जयवंत कापडे यांनी लॉकडाउन च्या बंदिस्त काळात मुलांच्या सुप्तकलागुणांना वाव मिळवून देण्यासाठी त्यांना व्यासपीठ मिळवून दिले याबद्दल त्यांचे कौतुक करण्यात आले.

तसेच प्रा.एच.डी.पाटील यांनीही आयोजकाचे स्तुत्य उपक्रमाबद्दल हृदयपूर्वक कौतुक केले.व यशस्वी विद्यार्थ्यांनी यशाने हूरळून जाऊ नका व अपयशी विद्यार्थ्यांनी खचून जाऊ नका असे विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. रुपाली चौधरीने आपले मनोगत व्यक्त केले.

आर.जे.जयवंत कापडे यांनी रुपालीची मुलाखत घेतली. यावेळी स्रियाविषयी आपले मत व्यक्त करताना तिने सांगितले की,आज जगामध्ये भारताचा महिला विकासात 114 वा क्रमांक आहे. म्हणजे अजूनही स्त्री विकास मागेच आहे.केवळ एक दोन स्रिया नव्हे, तर सर्वच महिला सर्व आघाडीवर यशस्वी झाल्या पाहिजेत.यानिमित्ताने एकच सांगेल स्त्रीच स्त्रीचा शत्रू असते हे प्रमाण नष्ट झाले पाहिजे.जसे शब्दात प्रेम असले तर मनाला जागवणारे साहित्य निर्माण होते.

आणि प्रेमाने एकत्र आलो तर हा समाज आणि देश घडतो तसेच महिलाच महिलेचा छळ करणार नाही तेव्हाच खऱ्या अर्थाने कौटुंबिक हिंसाचार रोखता येतील.असे वाटते. कारण,”स्त्रीच स्त्रीचा करते नाश, येथेच होतो खऱ्या स्त्रीत्वाचा ऱ्हास”म्हणून स्त्रीने स्त्रीला समजून घेतले पाहिजे.असे विचार यावेळी रुपाली नी मांडले.

महाराष्ट्र, सामाजिक , सांस्कृतिक, स्वास्थ 

©️ALL RIGHT RESERVED