शेतकऱ्यांच्या थेट खात्यावर मदत द्या – मा. अतुल भुसारी पाटील लोकशासन एकता पार्टी

9

✒️शेख आवेज(विशेष प्रतिनिधी,सेनगाव)मो:-8308862587

सेनगाव(दि.13ऑक्टोबर):-शेतकरी गेल्या तीन वर्षांपासून वेगवेगळ्या संकटातून सामोरे जात आहे.सतत पडणाराया दुष्काळला सामोरे जात होते परंतु या वर्षी देशावर कोरोना सारख्या रोगांची महामारी असल्याने शेतकऱ्यांना शेती करण्याशिवाय पर्याय शिल्लक नव्हता.

संर्पुन पिकांची मशागत झाली परंतु शेवटी तोंडी आलेला घास कालच्या पाऊसाने मातीमोल केला आहे. या मुग कापूस तुर मका सोयाबीन भाजीपाला जागीच सडत घगवुन येत आहे.त्यामुळे शेतकऱ्यांवर पुन्हा संकट आले.

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना या काळात दिलासा देण्याची गरज आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या थेट खात्यावर सरकारने मदत द्यावी आशी मागणी.. लोकशासन एकता पार्टी राष्ट्रीय अध्यक्ष मा. अतुल भुसारी पाटील यांनी केली आहे..