स्वतंत्र मजदूर यूनियन संलग्नित स्वतंत्र समता शिक्षक संघाने दिले आंदोलन पूर्व सुचनापत्र

49

🔹विदर्भ प्रदेश विभागीय अध्यक्ष राजकुमार गेडाम यांनी दिली माहिती

✒️चिमूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

चिमूर(दि.14ऑक्टोबर):-कोव्हीड १९ चे काम करणाऱ्यांना मानधन देण्यात यावे, माझे कुटुंब माझी जबाबदारी या टिममध्ये काम करणाऱ्यांना ५ हजार रुपये देण्यात यावे, माझे कुटुंब माझी जबाबदारी या टिममध्ये काम करणाऱ्या सदस्यांना एक कोटी रुपयाचे विमा संरक्षण देण्यात यावे, काम करीत असताना टिममधील सदस्याचा मृत्यु झाल्यास त्याचे कुटुंबातील एका सदस्याला शैक्षणिक योग्यतेनुसार कायम स्वरुपी नोकरी देण्यात यावी.

एकाच पदावर २४ वर्ष सलग सेवा झालेल्या कर्मचाऱ्यांचे निवड श्रेणी प्रस्ताव मंजुर करणे. एकाच पदावर १२ वर्ष सलग सेवा झालेल्या कर्मचाऱ्यांचे वरिष्ठ/आश्वासीत प्रगती योजना प्रस्ताव मंजुर करणे. बिंदुनामावलीनुसार रिक्त पदे पदोन्नतीने भरणे, बिंदुनामावलीनुसार रिक्त पदांची सर्व विभागातील माहिती मिळणे. पदोन्नती प्रकरण सर्व विभाग निकाली काठणे. पंचायत समिती चिमूर मध्ये सेवाजेष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी मा. डि. जी. मेश्राम यांचेकडे प्रभार देण्याचे अनुषंगाने कार्यवाही करणे. पंचायत समिती चिमुर यांच्या प्रशासनाबाबत चौकशी करून प्रकरण निकाली काढणे, शासकीय सेवेत असलेल्या पालकांच्या पाल्याला शासकीय योजनेचा लाभ दिला.

काम केलेल्या ठेकेदारांना त्याचा मेहनतांना अजुनपर्यंत पुर्ण दिला नाही.पंचायत समिती चिमुर मधील बदली झालेला कर्मचारी यांना भारमुक्त न करता केवळ मोजक्या कर्मचाऱ्यांना भारमुक्त करुन पंचायत समिती मधील वातावरण चिघडविण्याचा प्रकार केला. सन २०२० मध्ये करण्यात आलेली बदली प्रक्रिया. नियमबाहय असल्याने रद्द करण्यात यावी. आदिवासी शिष्यवृत्ती प्रकरण जिल्हा परिषद शाळा मोटेगांव वर्ष २०१८-१९ मधील त्या प्रकरणातील आरोपीची पाठराखण करणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्याची चौकशी करुन त्यांच्यावर कार्यवाही करण्यात यावे.

एकात्मिक बालकल्याण विभाग, अंगणवाडी पर्यवेक्षक, सेविका, मदतनीस यांची रिक्त पदे शासनाचे निर्देशानुसार भरणेबाबत. रिक्त पदांची माहिती मिळण्यात यावी. शिक्षण विभाग, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक उच्च श्रेणी,विषय शिक्षकांची रिक्त पदे पदोन्नतीने शासनाचे निर्देशानुसार भरणेबाबत. रिक्त पदांची माहिती मिळण्यात यावी. आस्थापनेतील सर्व विभागातील रिक्त पदे पदोन्नतीने भरणेबाबत. ग्रा. पं. विभाग, व्हिडीओ, ग्रामसेवक यांची पदे पदोन्नतीने भरणेबाबत. रिक्त पदांची माहिती मिळण्यात यावी. प्रत्येक ग्रा.पं. ला स्वतंत्र ग्रामसेवकाची नियुक्ती करण्यात यावी.

समाजकल्याण शिष्यवृत्ती- सावित्रीबाई फुले, ओबीसी विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती, अस्वच्छ काम करणाऱ्या पालकाचे पाल्याला मिळणारी शिष्यवृत्ती अनेक वर्षापासुन अप्राप्त आहे. ती मिळण्यासंदर्भात कार्यवाही करण्यात यावी. अशाप्रकारचे निवेदन विदर्भ प्रदेश विभागीय अध्यक्ष राजकुमार गेडाम यांनी दिले. या स्वतंत्र मजदुर युनियनचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. एस. पाटील नागपूर, राष्ट्रीय सरचिटणीस डॉ. ए. व्ही. किरण आंध्रप्रदेश या असुन हि संघटना ट्रेड युनियन असुन २२राज्यात विस्थापित झालेली आहे. अशाप्रकारचे निवेदन प्रशासनाला दिले.

संघटने बाबतीत बोलताना गेडाम म्हणाले,संघटनेचे काम देशव्यापी असून अन्य संघटनेचे काही पदाधिकारी आमच्या कडे प्रवेश करण्यासाठी इच्छुक आहेत,मात्र प्रवेश्याकरीता आमचे काही ध्येय व धोरण निश्चित केले आहे, ते निकष पूर्ण करण्यासाठी व जुने घर(संघटना) सोडून आमचे सोबत का येता?याबाबत सविस्तर विचार करण्याची संधी आम्ही दिली आहे.येत्या काळात बरेचसे शिक्षक नेते आमचे सोबत दिसतील, त्यांची नावे सध्या उघड केले जाणार नाही, अशी सविस्तर माहिती गेडाम यांनी आमच्या प्रतिनिधी ला दिली