हिंदी अध्यापक संघाचे आंतरराष्ट्रीय वेबिनार संपन्न

28

✒️अनील साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)मो:-8698566515

गंगाखेड(दि.14ऑक्टोबर):-महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालय हिंदी अध्यापक संघच्या वतीने पहिले आंतरराष्ट्रीय वेबिनारचे आयोजन गुगल मिटच्या माध्यमातून करण्यात आले होते. या आंतरराष्ट्रीय वेबिनार मध्ये दुबईचे विख्यात साहित्यिक व उद्योजक विनोद तिवारी यांनी ९ ऑक्टोबर रोजी मार्गदर्शन केले.
अन्तराष्ट्रिय वेबिनार साठी विशेष उपस्थिति बीपी कॉलेज बारामती चे प्राचार्य डॉ भरत शिंदे तसेच कार्यक्रमाचे अध्यक्षपद राज्याध्यक्ष डॉ. मिलिंद कांबळे यांनी भूषविले यावेळी प्राचार्य डॉ. भरत शिंदे यांनी हिंदी संघटना करत असलेल्या कामाचा गौरव केला.

त्याचप्रमाणे त्यांनी हिन्दीतुन केलेल्या भाषणात आंतरराष्ट्रीय स्तरावर हिंदीचे महत्व कसे वाढत आहे याचा उल्लेख केला. व कार्यक्रमाचे मुख्य अतिथि विनोद तिवारी दुबई येथून सहभागी होऊन विश्व मे हिंदी भाषा का विस्तार और महत्व या विषयावर आपले विचार व्यक्त केले.आपल्या भाषणात त्यांनी हिंदी भाषेचे आंतरराष्ट्रीय महत्व सांगितले. राज्याध्यक्ष डॉ. मिलिंद कांबळे यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात पहिल्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील वेबिनार घेण्याचा उददेश्य स्पष्ट केला.व संघाद्वारे होत असलेल्या कार्याचा आढावा घेतला. आंतरराष्ट्रीय वेबिनार मध्ये ‘विश्व मे हिंदी भाषा का विस्तार और महत्व’ या विषयावर डॉ. वंदना पावसकर मुंबई डॉ.राजकुमार कांबळे औरंगाबाद डॉ. संजना ओटावनेकर रत्नागिरी प्रा.नंदा गायकवाड़ कोल्हापुर प्रा. संजय पवार पुणे प्रा.सुरेखा दुबे वर्धा प्रा. सुदाम पाटिल नाशिक दर्शना बोरकर गोंदिया प्रा. हसन शेख अमरावती प्रा राजेसाब मौजन लातूर आदींनी पेपर वाचन केले.

सदरील कार्यक्रमामध्ये सहभागी झालेल्या सर्व प्राध्यापकांना प्रमाणपत्र व ई-पुस्तक देण्यात आले.गूगल मीट द्वारे आयोजित केलेल्या या वेबिनार मधे गंगाखेड सह राज्यातील 250 प्राध्यापकांनी सहभाग घेतला.कार्यक्रमाचे आयोजन राज्यसचिव प्रा.रेवननाथ कर्डिले राज्यकार्याध्यक्ष प्रा. सुंदर लोंढे यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. चारु दाभोलकर, प्रा.रेवननाथ कर्डिले यांनी केले.आभार प्रदर्शन डॉ प्रा. नेहा बोरसे यांनी केले.