ना.धनंजय मुंडे यांचे समर्थक अँड.मनजीत सुगरे यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा

31

🔹कृषी उत्पन्न बाजार समिती प्रांगणात स्व.पंडितआण्णा मुंडे चौकात अँड.मनजीत सुगरे यांच्या वाढदिवसानिमित्त कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्वयंचलीत निर्जंतुकीकरण केंद्राचा शुभारंभ व लोकार्पण

✒️अतुल बडे(परळी प्रतिनिधी)मो:-9096040405

परळी वैजनाथ(दि.15ऑक्टोबर):- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांचे समर्थक राष्ट्रवादी काँग्रेसचे लीगल सेलचे अध्यक्ष अँड. मनजीत सुगरे यांचा वाढदिवस सामाजिक बांधिलकी जपत व सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. वाढदिवस निमित्ताने अनावश्यक खर्चाला फाटा देत कृषी उत्पन्न बाजार समिती प्रांगणात व स्व.पंडितआण्णा मुंडे चौकात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्वयंचलीत निर्जंतुकीकरण केंद्राचा शुभारंभ व लोकार्पण करण्यात आला.

देशासह संपूर्ण जगात सद्यस्थितीत कोरोना विषाणुसंसर्ग आजाराच्या जागतिक महामारीने सर्वत्र थैमान घातले आहे. व त्यामुळे देशात व राज्यात आपत्कालीन परिस्थती निर्माण झालेली आहे. अशा परिस्थितीत कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात येणाऱ्या शेतकरी नागरिकांना व्यापारी यांना कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपयुक्त असे पिक विम्याचे जनक स्व.पंडितअण्णा मुंडे चौक,परळी वैजनाथ येथे संपूर्ण शरीर स्वयंचलीत निर्जंतुकीकरण यंत्राचे लोकार्पण उपक्रम परळी नगरीचे माजी नगराध्यक्ष तथा रा.कॉ.पार्टीचे शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी यांच्या शुभ हस्ते व जेष्ठ नेते सुरेश अण्णा टाक,रा.कॉ युवक चे शहराध्यक्ष सय्यद सिराज, मा.नगरसेवक बाळू सेठ लड्डा यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये पार पडला. यावेळी विश्वनाथ गायकवाड, रंगनाथ सावजी, मुक्तर भाई, देवराव कदम, गणेश मगर, सुनील तरटे, मुन्ना, रंजीत सुगरे आदी उपस्थीत होते.

राजकिय कार्याबरोबर सामाजिक कार्यातही अँड.मनजीत सुगरे अग्रेसर आसतात, गोर गरीब नागरिकांच्या मदतीला धावून येतात, कोरोना संकट काळात ही त्यांनी मास्क वाटपा बरोबर सामाजिक बांधिलकी जपत दवाखान्यासाठी मदत करणे, जनतेच्या सुखःदुःखात धावुन जाणारे एक सामान्य व्यक्तीमत्व आहेत. शहरात कामानिमित्त येणार्‍या तालुक्यातील शेतकर्‍यांना  सुविधा व्हावी म्हणून नाथ प्रतिष्ठानच्या वतीने चालवल्या जाणार्‍या स्व.पंडीतअण्णा मुंडे शेतकरी भोजन गृहात  नेहमीसाठी केवळ 10 रूपयात जेवण मिळत होते.

आता याच ठिकाणी शिवभोजन केंद्र मान्यता दिल्याने  केवळ पाच रुपयात जेवण मिळून अल्पदरात गोरगरीबांसाठी सेवा उपलब्ध करून दिली आहे. जनतेच्या प्रश्नाची जाण ठेवून ते प्रश्न सोडविण्यासाठी कठिबध्द राहतात. ना.धनंजय मुंडे यांचे कट्टर समर्थक अँड. मनजीत सुगरे यांचे कुठल्याही क्षेत्रात मोलाचे योगदान असणारे व्यक्तीमत्व आहे.

कोरोना संकटकाळात आपला वाढदिवस थाटामाटात साजरा न करता सामाजिक बांधिलकी जोपासत येथील अँड मनजीत सुगरे यांनी लॉकडाऊन काळामध्ये त्यांनी अनेक सामाजिक उपक्रमातून सामाजिक बांधिलकी जोपासली. गरजूंना वेळोवेळी मदत केली. अनेकांना सर्वोतोपरी सहकार्य केले. शासनाने वेळोवेळी दिलेले निर्देश पाळून,वेळोवेळी मास्क आणि सॅनिटायझर वापरून सोशल डिस्टन्स पाळून आज सर्वांनी मिळून कोरोनाला हरवण्यासाठी एकत्र यायला हवे असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस संघटन मजबुत करण्यासाठी व आपल्या पक्षाच्या वतीने जनसामान्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी या शुभेच्छांच्या बळावर आपण कटीबध्द राहुन आणखी उमेदिने सामाजिक कार्य करु असे त्यांनी म्हटले आहे.

अँड.सुगरे यांच्या वाढदिवसानिमित्त आज पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्यासह विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना प्रत्येक्ष भेटुन तसेच मोबाईल, एसएमएस, व्हाट्‌सअप आदींच्या माध्यमातुन शुभेच्छा दिल्या. दरम्यान शुभेच्छा देणार्‍या सर्वांचे अँड.मनजीत सुगरे यांनी आभार मानले.