गिरणी ताब्यात घ्यावी व नंतर पैसे द्यावेत

33

🔸ग्राहकांनी गिरणीची गुणवत्ता तपासून घ्यावी – आमदार अशोकबापु पवार

✒️शिरूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

शिरूर(दि.15ऑक्टोबर):-शिरूर-हवेली मतदारसंघांमध्ये सध्या आमदार अशोक बापू पवार यांच्या विशेष प्रयत्नातून 50% सवलतीत घरगुती पीठगिरणी दिली जाईल, अशा संदर्भाचा मेसेज सोशल मीडियावर फिरत आहे.

तरी कृपया फसवणूक टाळण्याकरिता ग्राहकांनी आधी गिरणी ताब्यात घ्यावी व नंतर पैसे द्यावेत. तसेच ग्राहकांनी गिरणीची गुणवत्ता तपासून घ्यावी. असे आवाहन आमदार अशोकबापु रावसाहेबदादा पवार.
(शिरूर-हवेली विधानसभा मतदारसंघ.) यांनी केले.