पावसाने उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना तत्काळ आर्थिक मदत करावी

56

🔸अन्यथा आंदोलन छेडू

🔹अतुल खुपसे पाटिल यांचा इशारा

✒️अतुल उनवणे(विशेष प्रतिनिधी)मो:-9881292081

सोलापूर/कुर्डूवाडी(दि.17ऑक्टोबर):-पावसाळाच्या हंगामाच्या अखेरीला परतीच्या पावसाने माढा व करमाळा तालुक्या सह सोलापूर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रभर पावसाने थैमान मांडले आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीमालाचे करोडो रुपयांचे नुकसान झाले आहे . नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे करुन त्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी अतुल खूपसे पाटील यांनी केली आहे.

महाराष्ट्रचे मुख्यमंत्री, सोलापूर जिल्हाधिकारी सह संबंधितांना पत्र लिहून अतुल खुपसे यांनी मागणी केली आहे की, पावसाने शेतकऱ्यांचे खुप मोठे कधीही भरून न निघणारे आर्थिक नुकसान झाले आहे. साखर कारखान्यांना आता जाणारा ऊस शेता मध्ये आडवा पाडून पार सडून गेला आहे. यामुळे सदरील उस साखर कारखाना नेईल की नाही याची शाश्वती नाही आणी जो उस चांगला निघेल त्या उसाचे वजन ही अत्यंत कमी होऊन ऊस उत्पादकांना मोठा फटका बसणार आहे . केळीच्या पपई व द्राक्षाच्या बागा याचे तर अतोनात नुकसान झालेले आहे.

शेतकऱ्यांच्या शेता मधी तूर सोयाबीन उडीद यालाही फार मोठा फटका बसलेला आहे . फळ बागायतदार शेतकरी तर पुढील द‍ाेन वर्ष उबदारी येनार नाही.भाजीपाला टोमॅटो सारखी पिके मुसळधार पावसात जमीनदोस्त झालेली आहेत . पुराच्या पान्यात जनावरे वाहून गेलीत . अनेक घरा मध्ये पाणी शिरुन माेठे नुकसान झाले आहे . शेतकरी वर्गाचे नुकसान कधीही भरून न येणारे आहे . यामुळे शासनाच्या कृषी विभागाने महसूल विभागाने शेतकऱ्यांच्या नुकसानीचा तत्काळ पंचनामे करावेत . नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना हेक्टरी एक लाख रुपये मदत देण्याची मागणी अतुल खूपसे पाटील यांनी निवेदना द्वारे केलेली आहे.

शेतकऱ्याला मदत शासनाने केली नाही तर भविष्यात आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिलेला आहे .यावेळी उपस्थित:- मोरया ग्रुप उपळवटे संस्थापक अध्यक्षअक्षय भैय्या देवडकर,महाराष्ट्र विकास विद्यार्थी आघाडी प्रमुख विजय खूपसे,सोलापूर जिल्हा अध्यक्ष अमित चोपडे,पंढरपूर तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर बनसुळ,माळशिरस तालुका अध्यक्ष सुरेश शेंडगे,करमाळा तालुका अध्यक्ष विजय बेरे, माढा तालुका अध्यक्ष जमीर सय्यद,बार्शी तालुका अध्यक्ष दयानंद आवारे होते.