राष्ट्रीय पेयजल योजने अंतर्गत नायगाव ता.हवेली जि.पुणे पाणीपुरवठा योजना उदघाटन समारंभ

28

✒️सुनिल ज्ञानदेव भोसले(पुणे प्रतिनिधी)

पूणे(दि.19ऑक्टोबर):-राष्ट्रीय पेयजल योजने अंतर्गत नायगाव ग्रामीण पेयजल योजन उदघाटन समारंभ संसदरत्न खासदार.मा.श्री.डॉ.अमोल कोल्हे साहेब व शिरूर -हवेलीचे आमदार.मा.श्री.अशोकबापु पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या शुभहस्ते व नायगाव सरंपंच.सौ. प्रज्ञा साखरे,उपसरपंच.सौ. कल्पना चौधरी यांच्या उपस्थित ग्रामीण पाणीपुरवठा योजना टाकी पुजन, पाणी पुरवठा विहिर जलपुजन व पंपहाऊस उदघाटन कार्यक्रम करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष.मा.श्री. अशोकबापु पवार आमदार शिरूर – हवेली होते.

यावेळी उपस्थित सर्व पत्रकार बंधुचे व मान्यवरांचे सत्कार करण्यात आले. प्रास्ताविक पाणीपुरवठा समिती अध्यक्ष.श्री.राजेंद्र चौधरी यांनी केले. सौर ऊर्जा प्रकल्प व त्यासाठी आवश्यक जागा मंजुरी, अंतर्गत रस्ते,माहिला अस्मिता भवन, पिक नुकसानभरपाई,जि.प शाळा ४ वर्ग खोल्या , पाणंद रस्ता, शिव रस्ता, इत्यादी साठी मदत करण्याचे खासदार व आमदार साहेब यांना आवाहन करण्यात आले व त्यांनी सर्व विकास कामांसाठी मदत करण्याचे मान्य केले.

सूत्रसंचालन व समारोप रामचंद्र पवार कार्यक्रम साठी श्री.दिपक चव्हाण सरकल उरळी कांचन,सनीशेठ काळभोर, प्रशांत शिर्के, दिलीप वाल्हेकर, दिपक चव्हाण, आण्णासाहेब महाडिक, राजेंद्र मधुकर चौधरी, सुजित चौधरी, महेश सुरोडकर, तलाठी गवारे, ग्रामसेवक. राजगुरु मॅडम,ग़वळी साहेब, खरात मॅडम, संतोष बोधे, तात्या काळे, हिरामण काकडे, सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य राजेंद्र चौधरी, संतोष हगवणे, कल्पना पवार, दत्तात्रय बारवकर, वैशाली चौधरी, सुनिता गायकवाड, छाया गायकवाड, कैलास चौधरी, अर्जून चौधरी, सुभाष चौधरी, पोपट चौधरी, रामचंद्र पवार, उत्तम घुले, दत्तात्रय हगवणे, गोरख चौधरी, बापू चौधरी, चंद्रकांत चौधरी, नितीन हगवणे, उत्तम शेलार, माऊली चौधरी, शिवाजी चौधरी, विकास चौधरी, गणेश चौधरी, हवेलीचे पत्रकार, या मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम झाला.