मनसेच्या निवेदना नतंर महावितरण ने दिले संबधित विभागाला दुरुस्ती करण्याचे आदेश

24

✒️अंगद दराडे(विशेष प्रतिनिधी)मो:-8668682620

औरंगाबाद(दि.20ऑक्टोबर):- वार्ड क्र.४१ म्हाडा कॉलनी, रायगडनगर व प्रतापगडनगर मधील जीर्ण अवस्थेत असलेल्या डीपी, फ्यूज, मीटर बॉक्स, सर्व्हिस केबल्स बदलणे बाबत महावितरणचे अतिरिक्त अभियंता श्री.कराळे साहेबांसोबत निवेदन देऊन चर्चा करण्यात आली.यावेळी त्यांनी तात्काळ संबंधित विभागाला पाहणी करून दुरुस्ती करण्याचे आदेश दिले.

यावेळी मनसेचे गणेश साळुंके यांच्यासह शहर सहसचिव दिपक रा. पवार, शहर सचिव संतोष कुटे, विभाग अध्यक्ष चंदू नवपुते, युवराज गवई हे उपस्थित होते.