पँथर राजन माकणीकर यांच्या जन्मदिवस निमित्ताने शेकडोंना नियुक्ती

31

🔸अँड. नितीन माने राष्ट्रीय कायदेशीर सल्लागार पदी

✒️मुंबई(पुरोगामी संदेश नेटवर्क)

मुंबई(दि.21ऑक्टोबर):-पत्रकार, सामाजिक व आरटीआय कार्यकर्ते, कवी लेखक, चारोळीकार, लघुउद्योजक पँथर डॉ. राजन माकणीकर यांचा जन्मदिवस नुकताच जयभीम नगर बुद्ध विहार हिरानंदानी येथे उत्साहात साजरा करण्यात आला, यावेळी सुप्रसिद्ध विधिज्ञ ऍड नितीन माने यांनी कायदेशीर सल्लागार पदी नियुक्ती करण्यात आली.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे राष्ट्रीय महासचिव व पँथर ऑफ सम्यक योद्धाचे संस्थापक महासचिव डॉ राजन माकणीकर यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून संघटनेचे उपाध्यक्ष वीरेंद्र लगाडे यांनी संघटनेच्या नियुक्ती पत्राचे अनावरण करण्याचा मानस व्यक्त केला.

संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष पुज्य भदंत शिलबोधी यांच्या मार्फत जन्मदिवसाची विधी पूर्ण करून नियुक्ती पत्र व संघटनेचे लेटरहेड पुस्तिकेचे अनावरण करण्यातआले. पँथर ऑफ सम्यक योद्धा या राष्ट्रीय लढाऊ संघटनेच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येऊन वीरेंद्र लगाडे संयोजित कार्यक्रमाचे आयोजन पँथर श्रावण गायकवाड यांनी केले.देशातील वंचित समाजाच्या न्यायिक हक्कासाठी तन मन धनाने कार्य करून अन्याय अत्याचाराच्या विरोधात मी स्वयंस्फूर्तीने अग्रेसर होऊन पीडिताला न्याय मिळवून देण्यासाठी अहोरात्र प्रयत्नशील असेल, असे मत नवनिर्वाचित राष्ट्रीय कायदेशीर सल्लागार ऍड. नितीन माने यांनी व्यक्त केले.

संविधान, व संविधानिक हक्क मूलभूत अधिकार व स्वाभिमान जपण्यासाठी सम्यक पँथर ची उभारणी केली असून संविधानाला मानणाऱ्या सर्व जातीधर्माच्या व्यक्तीसाठी संघटनेचे स्वागत असून संबंध भारतात संघटनेचे जाळे पसरविण्यात येणार असून इच्छुकांनी 9004363903 या व्हाट्सअप्प क्रमांकावर संपर्क साधण्याचा आवाहन पुज्य भदंत शिलबोधी यांनी केले.
देशातील जातीय आराजकतेवर घाव घालण्यासाठी सम्यक पँथर्स ची स्थापना झाली असून संघटन वाढविण्यासाठी मी व माझी टीम सातत्याने कार्यरत असून दांभिक प्रवृत्तीना ठेचून काढू असे वक्तवे उपाध्यक्ष वीरेंद्र लगाडे यांनी केले.

डॉ. राजन माकणीकर सरांनी चिवरधारी पँथर्स ची संकल्पना मांडली असली तरी पुज्य भदंत शिलबोधी यांनी ती पूर्णत्वास अनुनू संघटनेत प्राण ओतला आहे यामुळे भारत भर संघटना वाडीस लागली असून सर्व पदाधिकाऱ्यांचे मनःपूर्वक स्वागत व अभिनंदन यावेळी पँथर श्रावण गायकवाड यांनी अभिप्राय व्यक्त केला.

संघटनेचे राष्ट्रीय संघटक राजेश पिल्लई, प्रकाश बोराडे, नरेश शिर्के, प्रमुख पाहुणे म्हणून उपस्तीत होते, तर आकाश रावते, किरण चौरे, नित्यानंद नाडार, मोहम्मद उमर, रोहित कलमबे, कार्यक्रम यशवितेसाठी अथक परिश्रम घेतले.