मराठवाडासह हिंगोली जिल्हात अतिवृष्टीमुळे झालेल्या पीकांचे पंचनामे करा

31

🔹जगदंब युवा ग्रुप महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्ष विठ्ठल मोहनकर यांची मागणी

✒️शेख आवेज(विशेष प्रतिनिधी,सेनगाव)मो:-8308862587

सेनगाव(दि.21ऑक्टोबर):-मराठवाड्यासह हिंगोली जिल्ह्यात यावर्षी अत्यंत मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्यामुळे प्रशासनाने लवकरात लवकर पंचनामे करून ओला‌ दुष्काळ जाहीर करावा, तसेच नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी अशी मागणी जगदंब युवा गु्प महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्ष विठ्ठल मोहनकर यांनी केली.

मराठवाड्यातील शेतकऱ्यांची प्रमुख पिके सोयाबीन, कापूस,तुर हे नगदी पिके असुन यावर्षी अतिवृष्टीमुळे या सर्व पिकांची मोठ्या प्रमानात नुकसान झाले आहे. तरी राज्य आणि केंद्र सरकारने मराठवाड्यातील शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत करावी अशी मागणी जगदंब युवा गु्प महाराष्ट्र राज्य चे प्रदेश अध्यक्ष विठ्ठल मोहनकर यांनी केली आहे.