जालना येथील मोती तलावचे लाखो लीटर पाणी वाया

31

🔹जिल्हाधिकारी जालना यांच्या आदेशाची अंमलबजावणी नाही

🔸स्वखर्चाने पाण्याचा सांडवा बंद केल्याचा नुसता दिखावा-गणेश दादा सुपारकर

🔹संबंधितांनी लक्ष घालून वाया जाणारे सांडव्याचे पाणी त्वरित बंद करण्यात यावे-गणेशदादा सुपारकर

✒️अतुल उनवणे(जालना,जिल्हा प्रतिनिधी)मो:-9881292081

जालना(दि.21ऑक्टोबर):-येथील अत्यंत महत्वाचे असलेल्या मोती तलावच्या सांडव्यातून सांडवा बंद न केल्याने लाखो लिटर पाणी वाहून जाऊन वाया जात आहे. परिणामी या मोती तलावच्या माध्यमातून तलावच्या पूर्वेस जवळपास सर्व कॉलनी व परिसरातील कॉलनीला या तलावातील पाण्याचे पर्कुलेषन होऊन अनेक पाण्याचे बोर व हातपंप ला पाणी येऊन फायदा होतो.परंतु सांडव्यातून वाहून जाणारे पाणी बंद न केल्याने व चांगला पाऊस होऊनही मोतीतलावातील पाण्याची पातळी कमी होत असल्याने बोर आणी हातपंपचे पाणी आटन्याची भीती व्यक्त केली जात आहे.

तसेच पुढील काळाचा म्हणजेच उन्हाळ्यायेणाऱ्या पाण्याच्या टंचाईचाही सामना करण्याची वेळ येण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.प्रतिनिधीशी बोलतांना गणेश दादा सुपार यांनी म्हटलं की, जिल्हाधिकारी जालना यांनी संबंधित कामावर लक्ष घालण्यासाठी समिती गठित करून पंधरा दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते परंतु समितीने कोणतेही ठोस पावले उचलले नसल्याचे सांगितले.

जिल्हाधिकारी यांचे आदेश हे फक्त नावालाच काढले का असा सवाल उपस्थित होत आहे.तसेच अनेकांनी नुसते फोटो काढण्यापुर्तेच स्वखर्चाने वाहून जाणाऱ्या पाण्याच्या सांडव्याचे काम केलं असं दाखवण्यात आलं पण प्रत्यक्षात काहीच नाही असा बोललं जात आहे.तरी संबंधितांनी याकडे लक्ष देऊन भविष्यात येणाऱ्या पाणी टंचाईचा सामना करण्याची वेळ येऊ नये म्हणून तत्काळ तलावाच्या सांडव्यातून वाहून जाणारे पाणी बंद करण्याची मागणी करण्यात आली आहे.