कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महेश सिरसाट यांचा वाढदिवस साधेपणाने साजरा

28

✒️अतुल बडे(परळी प्रतिनिधी)मो:-9096040405

परळी वैजनाथ(दि.22ऑक्टोबर):- येथील सामाजिक कार्यकर्ते महेश सिरसाट यांचा वाढदिवस कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अगदी साधेपणा साजरा करण्यात आला. यावेळी दै.महाराष्ट्र प्रतिमाचे संपादक ज्ञानोबा सुरवसे पत्रकार प्रा.प्रविण फुटके, महादेव गित्ते तथा विविध क्षेत्रातील नामवंत मंडळींच्या हस्ते पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला. तसेच प्रत्यक्ष भेटुन तसेच सोशल मिडीया, फोनद्वारे वरून शुभेच्छा दिल्या.

शहरातील सौदागर फायनान्स येथे आज बुधवार, दि.21 आँगस्ट रोजी छोटेखानी कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ते महेश सिरसाटांचा वाढदिवस कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आगदी साधेपणाने वाढदिवस साजरा करून सत्कार करण्यात आला. महेश सिरसाट यांचे सामाजिक क्षेत्रात अतुलनिय कार्य आहे. त्यांच्या वाढदिवस यानिमित्त दिवसभर हजारो चाहत्यांनी त्यांचा सत्कार करुन वाढदिवसाच्या शुभकांमना व्यक्त केल्या.

यावेळी समाजातील सर्वच स्तरातुन त्यांना उदंड आयुष्याच्या शुभेच्छा देण्यात आल्या. त्यांना वाढदिवसानिमित्त आज विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना प्रत्येक्ष भेटुन तसेच मोबाईल, एसएमएस, व्हाट्‌सअप आदींच्या माध्यमातुन शुभेच्छा दिल्या. दरम्यान शुभेच्छा देणार्‍या सर्वांचे महेश सिरसाट यांनी आभार मानले आहेत.