जिल्हा परीषद गोंदिया (शिक्षण विभाग) ऑनलाइन कामात राज्यात अग्रेसर

63

🔹अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती चे कामात राज्यात प्रथम क्रमांक तर Inspire award चे कामात राज्यात 4था क्रमांक

🔸जिल्हास्तरावरील समग्र शिक्षा प्रोग्रॅमर, तालुकास्तरावरील MIS समन्वयक व डेटा एन्ट्री ऑपरेटर यांच्या मेहनतीला मिळाले यश

✒️गोंदिया(पुरोगामी संदेश नेटवर्क)

गोंदिया(दि.22ऑक्टोबर):-राज्यात कोविड 19 मूळे सर्वत्र प्रतिकूल परिस्थिती जरी असली तरी गोंदिया जिल्ह्यातील शिक्षण विभागाने ऑनलाइन कामात राज्यात उत्तुंग भरारी घेतली आहे. ज्यात सर्वत्र ऑनलाइन कामाचा व्याप वाढलेला असून कोविड 19 मुळे ऑनलाइन कामाची मागणी वाढलेली आहे. ज्यात अल्पसंख्याक शिष्यवृत्ती (रिनीवल) काम पूर्ण करण्यात राज्यात अव्वल तसेच inspire award ची नोंदणी करण्यामध्ये राज्यात 4था आणि विदर्भात प्रथम येण्याचा मान गोंदिया जिल्ह्याने मिळविलेला आहे.

गोंदिया जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीपकुमार डांगे यांचे प्रेरणेने शिक्षण विभाग गोंदिया चे शिक्षणाधिकारी द्वय (माध्य./प्राथ.) प्रफुल्ल कच्छवे व राजकुमार हिवारे यांचे मार्गदर्शनात समग्र शिक्षा गोंदिया येथील जिल्हा Programmer नितेश खंडेलवाल, तालुकास्तरावर कार्यरत MIS-Coordinator सुशील खापर्डे(आमगाव), श्रीकांत त्रिपाठी (गोंदिया), कु. शीतल कुम्भलवर (गोरेगाव), कु. स्वाती भोयर (सालेकसा), Data Entry Opertaor कैलास खोब्रागडे (गोंदिया), संजय मेश्राम( देवरी), आशा मासरकर (तिरोडा), कल्पना रहांगडाले(गोरेगाव), यांच्या कड्या मेहनतीने अल्पसंख्याक शिष्यवृत्ती (रीनेवल) चे काम पूर्ण करण्यात राज्यात अव्वल तसेच inspire award ची नोंदणी करण्यामध्ये राज्यात 4था आणि विदर्भात प्रथम येण्याचा मान गोंदिया जिल्ह्याने मिळविलेला आहे.

सदर यशाबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीपकुमार डांगे, शिक्षणाधिकारी (माध्य.) प्रफुल्ल कच्छवे आणि राजकुमार हिवारे शिक्षणाधिकारी(प्राथ.) यांनी सर्व ऑनलाईन कार्य करणाऱ्या समग्र शिक्षा कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.