पोस्टमन रमेश उडाण यांचा टपालदिनानिमित्त सत्कार

32

✒️गडचिरोली(पुरोगामी संदेश नेटवर्क)

गडचिरोली(दि.22ऑक्टोबर):- जागतिक टपाल दिनाच्या निमित्ताने गडचिरोली शहरातील टपाल वितरक रमेश उडाण यांचा सायकल स्नेही मंडळातर्फे सत्कार करण्यात आला. सायकल स्नेही मंडळाचे संयोजक ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर यांनी उडाण यांना राष्ट्रसंताचा ग्रंथ देऊन गौरव केला.

याप्रसंगी नशाबंदी मंडळाचे जिल्हा संघटक संदीप कटकुरवार उपस्थित होते.रमेश उडाण गेल्या २६ वर्षापासून सायकल द्वारे टपालाचे वितरण करीत असतात . मंडळातर्फे त्यांना निरामय जीवनासाठी शुभेच्छा दिल्यात.