पानगाव येथे साकारत असलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या भिंती-छताला पडल्या भेगा ठिकठिकाणी लागली गळती

30

🔸गुत्तेदार व ट्रस्ट च्या संगनमताने स्मारकाचे (स्तुपाचे)काम निकृष्ट दर्जाचे केल्याचा नॅशनल दलित मोमेंट फॉर जस्टीस (एन डी एम जे)या संघटनेचा आरोप

✒️लातूर (संजय कांबळे माकेगावकर)

लातूर(दि.22ऑक्टोबर):-महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने १० कोटी रुपये खर्चुन पानगांव येथे साकारत असलेल्या स्मारकाच्या छताला व भिंतीला भेगा पडल्यामुळे ठिकठिकाणी गळती लागली आहे तर भिंतीवर शेवाळे दिसत आहेत. स्मारकाचे (स्तुप ) काम गुत्तेदार व ट्रस्टच्या संगनमताने निकृष्ठ झाले असल्याने संबधिताची चौकशी करावी अशी मागणी नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टीस (एन.डी.एम.जे)या संघटनेने लातुर जिल्हाधिकारी याच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे.

लातूर जिल्ह्यातील पानगाव येथे १० कोटी रुपये खर्चुन उभे रहात असलेल्या महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारकास दिनांक 30.9.2020 रोजी नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टीस (एन डी एम जे)या संघटनेने भेट दिली असता स्मारक (स्तुप ) ठिक ठिकाणी गळत असल्याचे दिसून आले, भिंतीला व छताला भेगा पडलेल्या दिसल्या व स्मारकाच्या छतास शेवाळे दिसले, यावरून स्मारकाचे (स्तुपाचे ) काम निकृष्ट दर्जाचे असल्याचे कळते.

तसेच महाराष्ट्रातील जनता पानगाव येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची अस्ती असल्यामुळे स्मारकास सहा(6) डिसेंबर रोजी कर्नाटक मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र इतर ठिकाणाहून लाखोंचा जनसमुदाय अभिवादनास दर्शनास येतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे बांधकाम एक ते दोन वर्षे पूर्ण होऊन झाले आहे.व बांधकाम पूर्ण नवीन आहे.तरीसुद्धा स्मारकला भेगा पडणे,स्मारक गळणे, शेवाळ येणे व इतर व इतर काम निकृष्ट केल्याचे निदर्शनास येते तसेच या स्मारकास मोठ्या प्रमाणात खासदार आमदार फंड व इतरांकडून मोठ्या प्रमाणात देणगी मिळालेले आहेत.

व मिळत असतात तरी सुद्धा हे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे.हे काम करणारे संबंधित कर्मचारी ट्रस्टी व इतर बांधकाम गुत्तेदार यांनी संगनमताने निकृष्ट दर्जाचे काम केले आहे. तरी माननीय जिल्हाधिकारी साहेबांना विनंती करण्यात येते की पानगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे कामाची तपासणी करावी व संबंधित जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी.

अशी मागणी नॅशनल दलीत मुव्हमेंट फॉर जस्टीज NDMJ महाराष्ट्र चे मराठवाडा उपाध्यक्ष संजय कांबळे माकेगावकर, नॅशनल दलित मुव्हमेंट चे राज्य निरीक्षक दिलीप आदमाने, जिल्हाध्यक्ष सावन सिरसाठ, जिल्हा संघटक बाबासाहेब वाघमारे, जिल्हा उपाध्यक्ष पवन कांबळे सेलूकर,जिल्हासदस्य समाधान सुर्यवंशी आदींच्या निवेदनावर सह्या आहेत…