धनगर समाजाचे अर्ध जल समाधी आंदोलन

38

✒️अशोक हाके(बिलोली प्रतिनिधी)मो:-9970631332

बिलोली(दि.23ऑक्टोबर):-जय मल्हार सेना तथा धनगर आरक्षण समिती बिलाेलीच्या वतीने धनगर समाजाला भारतीय राज्य घटनेनुसार अनुसूचित जमातीचा दर्जा प्राप्तिसाठी बिलाेली शहर लगत असलेल्या मालगुजारी गांवठान तलावात अर्ध जल आंदोलन नुकतेच शांततेत संपन्न झाले.

भारतीय राज्य घटनेत अनुसूचि क्रं, ३६ मध्ये धनगर समाजाला अनुसूचित जमातीचा ऊलेख केलेला आहे ,केंद्र तथा महाराष्ट्र शासनातील अनेक लाेक प्रतीनीधीनी धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गात समाविष्ट करण्याविषयी सहमति दर्शवलेली आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अनुसूचित जमातीच्या तब्बल बावीस याेजना धनगर समाजासाठी मंजूरी दिलेली हाेती मात्र आताचे राज्य शासन धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या साेई सवलती व याेजनांचा लाभ न देता ऊलट चालढकल करीत आहे.

शेक्षणिक दृष्टीने धनगर समाज पुर्णपणे मागास आहे, शेक्षणिक व आर्थिक सध्या धनगर समाजाला सक्षम बनवण्यासाठी भारतीय घटनेनुसार अनुसूचित जमातीत समाविष्ट करने आवश्क आहे, जमाती प्रवर्गात समाविष्ट करण्यासाठी शासनाने लक्ष वेधून घेत जय मल्हार सेनेचे अनेक पदाधिकारी, समाज बांधव कुलदेवतेचे जय करीत अनुसूचित जमाती प्रवर्ग अंतर्गत पर्वरग अंतर्गत आरक्षणाची मागनी गावठाण तलावात अर्ध जल आंदोलन केले.

या वेळेस राज्य शासनाविषयी तिव्र नाराजी व्यक्त करण्यात आली, या आंदोलनात जय मल्हार सेनेचे देगलूर- बिलोली विधानसभा अध्यक्ष शिवकांत मैलारे,आनंदराव जिंके गागलेगावकर, गंगाधर साखरे, संदीप काळे, रामकिसन भत्ते ,साईनाथ घोडके यासह बहुसंख्य धनगर समाज बांधव हातात पिवळे ध्वज घेऊन “येळकोट येळकोट -जय मल्हार” चा जयघोष करीत आरक्षणाची मागणी लावून धरली.यावेळी पोलीस निरीक्षक शिवाजीराव डोईफोडे यांनी पोलिस बंदोबस्त ठेवला होता. व नायब तहसीलदार अरुण गौड यांचे व इतर शासकीय कर्मचार्‍यांचे सहकार्य लाभले.