दिव्यांगांनाअंत्योदय योजनेत सामावून घ्या-श्री विठ्ठलराव मंगनाळे

28

🔸हजारो दिव्यांग अंत्योदय पासून वंचित

🔹1995 चा अपंग पुनर्वसन काययदा व 2016चा दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम कायद्याचे प्रशासनाकडून उल्लंघन

✒️चांदु आंबटवाड(नायगाव,तालुका प्रतिनिधी)मो:-9307896949

नायगाव(दि.23ऑक्टोबर):- रोजी जिल्हा पुरवठा अधिकारी नांदेड यांना दिलेल्या निवेदनात असे नमूद केले की ग्रामीण भागासह शहरी भागातील दिव्यांगाना आपल्या जिल्हा पुरवठा विभागामार्फत स्वस्त धान्य तहसील कार्यालयाकडून दिले जाते परंतु दिव्यांग व्यक्तींना अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत अंत्योदय कार्ड दिले जात नाही.

महाराष्ट्र शासन अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग आचा दिनांक 17/ 7/ 2013 च्या शासन निर्णयानुसार दिव्यांगांना अंत्योदय राशन कार्ड देताना प्राधान्य देण्यात यावे असा आदेश असून देखील आपल्या जिल्ह्यातील सर्व तालुका पुरवठा विभाग दिव्यांगांना अंत्योदय राशन कार्ड देताना अडचणी निर्माण करत आहेत.

तसेच अंत्योदय योजनेचे उद्दिष्ट संपले आहे असे सांगून या योजनेपासून दिव्यांगाना वंचित ठेवण्यात येत असल्याचे प्रहार दिव्यांग संघटना नांदेड जिल्हा प्रमुख श्री विठ्ठलराव मंगनाळे यांनी जिल्हा पुरवठा अधिकारी नांदेड यांना दिलेल्या लेखी निवेदनाद्वारे कळवले यावेळी नांदेड जिल्हा सचिव मारुती मंगरुळे साहेब व नायगाव तालुका अध्यक्ष साईनाथ बाबाराव बोईनवाड हजर होते.