मुख्यमंत्री सौर कृषि पंप योजनेकरीता ऑनलाईन अर्ज करावेत

77

✒️नितीन रामटेके(गोंडपिपरी,तालुका प्रतिनिधी)
मो:-8698648634

गोंडपिपरी(दि.23ऑक्टोबर):- उपसंचालक (सांख्यिकी) समाज कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य,पुणे यांनी मुख्यमंत्री सौर कृषी पंप यांजनेंतर्गत लाभार्थ्यांना ऑनलाईन पोर्टलवर अर्ज करण्यास सुचित करण्याची कार्यवाही करणे बाबत प्रस्तुत कार्यालयास कळविलेले आहेत.

या अनुषंगाने मुख्यमंत्री सौर कृषि पंप योजनेतंर्गत सौर पंपाचा लाभ ज्या अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील लाभार्थ्यांना घ्यावयाचा आहे.अशा लाभार्थ्यांनी महावितरणचे ऑनलाईन पोर्टल www.mahadiscom.in/solar या लिंकवर ऑनलाईन अर्ज करावेत.असे आवाहन सहायक आयुक्त समाज कल्याण यांनी केले आहे.