भिम आर्मी महाराष्ट्र प्रदेश अधक्षा नेहा ताई शिंदे च्या कार्याचा झंजावात “उत्तर महाराष्ट्र चा दौरा करून मुंबईत कार्यक्रमास दाखल

34

✒️सुरेश वाघमारे(मुंबई प्रतिनिधी)मो:-9867571531

मुंबई(दि.23ऑक्टोबर):-संपूर्ण देशात भाई चंद्रशेखर आजाद यांच्या कार्यास जनता आकर्षित झाली असून येत्या काळात भिम आर्मी भारत एकता मिशन या देशात लवकरच सत्तेची चाबी आपल्या हाती घेतल्या शिवाय राहणार नाही .असे स्पष्ट चित्र बहुजन समाजात भिम आर्मी च्या रूपाने दिसत आहे जे स्वप्न विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच होत कि आपल्या शासन करती जमात बना तेंव्हा तुमच्यावरील अन्याय दूर होतील ते स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी भाई चंद्रशेखर आजाद आणि विनय रतन सिहं यांच्या स्वरूपाने साकार होऊ शकते त्यात महाराष्ट्र ला लागलेली गट बाजी ची किड आणि होरपळत चाललेली दिशाहीन आंबेडकरी जनता यांना महाराष्ट्रा मध्ये बहुजन नायक कांशीराम यांच्या उत्तर प्रदेश सोशियल इंजिनरीग चा प्रयोग राबविण्यासाठी आता भिमआर्मी महाराष्ट्र प्रदेश प्रमुख नेहाताई शिंदे या संघटनेच्या बांधणीसाठी उत्तर महाराष्ट्र दौऱ्यावर होत्या.

१० तारखेला नाशिक येथे ताईंच्या हस्ते भिमआर्मी संपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले मा. नेहाताईंनी कार्यकर्त्यांनी संघटना वाढीसाठी काय काय करणे गरजेचे आहे या बरोबरच कार्यकर्त्यांना संघटनेची जडणघडण व संस्थापक भाई चंद्रशेखर आजाद, राष्ट्रीय अध्यक्ष विनय रतन सिंग, महासचिव कमल वालिया व उपाध्यक्ष मनजीत नैटीयाल यांच्या संघर्षाची माहीती देऊन त्यांनी भिमआर्मी ही संघटना शिव, शाहू, फूले तसेच महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर व मान्यवर कांशीराम जी यांच्या विचारधारेवर आधारलेली आहे.

आणि महापुरुषांचे विचारच समाजाची उन्नति आहे हे सांगितले. दि. ११ आॅक्टोबर रोजी मनमाड या क्रांतीभूमीमध्ये कार्यकर्ता केडर व पद नियुक्ति चा कार्यक्रम आयोजित केला होता. १३ तारखेला धूळे येथील भिमआर्मी चे .हात रस मनीषा हत्याकांड निषेधार्थ एकदिवसीय धरणे आंदोलनात ताईंनी सहभाग घेतला व रॅलीचे नेतृत्व केले. या सर्व दौर्यात भिमआर्मी महाराष्ट्र संघटक जयश्री माई सावर्डेकर या गाईंच्या बरोबरीने उपस्थित होत्या. या संपुर्ण दौर्यात ठिकाणी कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहाने ताईंचे स्वागत केले.

नेहा ताई नी उत्तर महाराष्ट्र मध्ये बऱ्याच गावी भेट दिली त्याना भिम आर्मी मध्ये काम करण्यासाठी युवकांची फौज निर्माण करा असे आवाहन केले यावेळी.नाशिक जिल्हा प्रमुख भुषण बर्वे आणि धुळे जिल्हा प्रमुख संजय चव्हाण यांनी संघटनेची बांधणी उत्कृष्ट पणे केल्या बद्दल नेहाताईंनी त्यांचे कौतूक करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या नेहा ताई च्या कालखण्डात भिम आर्मी महाराष्ट्र मध्ये चांगली वाढत असून कार्यकर्त्यांमध्ये हुरूप आणि उत्सहा.निर्माण झाला आहे.

प्रत्येक जिल्ह्यातील टीम जोमाने कामाला लागली आहेत .दिनांक 25.आक्टोबर ला दहिसर येतील केतकी पाडा येथे मुंबई प्रदेश अध्यक्ष दीपक हनवते यांच्या नेतृत्वात मध्ये व उत्तर मुंबई जिल्हा अध्यक्ष सुरेश वाघमारे यांच्या देखरेखी खाली भिम आर्मी च्या वतीने आंबेडकर चौक चे उदघाटन व कोरोनाचे नियम पाळत मार्गदर्शन नेहा ताई शिंदे करणार आहेत .भिम आर्मी च्या वाघीण म्हणून नेहाताई चा झंजावात भाई चंद्रशेखर आजाद यांच्या विस्वासास पात्र ठरत आहे.