मोटार वाहन परवान्यासाठी स्लॉट बुकिंग मध्ये वाढ

30

🔹 शनिवार – रविवारला उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सुरू राहणार

✒️नितीन रामटेके(गोंडपिपरी,तालुका प्रतिनिधी)मो:-8698648634

गोंडपिपरी(दि.24ऑक्टोबर):- चंद्रपूर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयातर्फे शिकाऊ अनुज्ञप्ती (लर्निंग लायसन्स) व पक्के अनुज्ञप्ती (परमनंट लायसन्स) यासाठी जनतेला प्रतीक्षा करावी लागू नये म्हणून स्लॉट बुकिंग दिनांक 22 ऑक्टोबर 2020 पासून वाढविण्यात येत आहे.

दिनांक 24 व 25 ऑक्टोंबर 2020 शनिवार व रविवार सुट्टीचे दिवशी शिकाऊ अनुज्ञप्ती व पक्के अनुज्ञप्तीचे काम सुरू राहील. तसेच प्रत्येक शनिवार व रविवारला शिकाऊ व पक्के अनुज्ञप्ती चे कामकाज सुरू ठेवण्यात येणार आहे. तरी नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक जाधव यांनी केले आहे.