कुंडलवाडी शहरातील प्रभाग क्र.७ मध्ये नगराध्यक्षा सुरेखा जिठ्ठावार यांच्या हस्ते बोअरचे उदघाटन

28

✒️अशोक हाके(बिलोली,तालुका प्रतिनिधी)मो:-9970631332

कुंडलवाडी(दि.25ऑक्टोबर):-शहरातील प्रभाग क्र.७ मधील नगरसेविका शकुंतलाबाई खेळगे यांनी नगरपरिषद निवडणूक वेळी प्रभागात बोअर मारण्याचे आश्वासन दिले होते.त्या वचनाची वचनपुर्ती करीत देशमुख गल्ली भागात स्वखर्चातुन बोअर मारुन मोटार बसवून दिले.त्या बोअरचे उदघाटन दि.२४ आँक्टोबर रोजी सांयकाळी ५ वाजता नगराध्यक्षा सुरेखा जिठ्ठावार यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी माजी नगराध्यक्ष सुनील बेजगमवार, नरेंद्र जिठ्ठावार, नगरसेवक सुरेश कोंडावार, सचिन कोटलावार, नगरसेविका शकुंतलाबाई खेळगे,नगरसेविका प्रतिनिधी पोशट्टी पडकुटलावार,व्यंकट श्रीरामे,गंगाधरराव खेळगे,भीम पोतनकर,गंगाधर पेंटावार ,रमेश पेंटावार,माजी नगरसेविका रूक्मीनीबाई कंदाकुर्ते,माधव डोपावार,नरसिमलु नागुलवार,सायलु कंदाकुर्ते,सुरेश नागुलवार, हणमलु कंदाकुर्ते, बाबुराव शिंदे,गंगाबाई नागुलवार, लक्ष्मीबाई डोपावार,स्वाती खराडे,कुलदीप खेळगे,प्रदिप खेळगे,नरसिमलु कंदाकुर्ते,पत्रकार कुणाल पवारे, सिद्धार्थ कांबळे यांच्यासह प्रभागातील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.