वडनेर येथे समता सैनिक दलाच्या वतीने धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा

29

🔹संघटना जिवंत असतेच,प्रामाणिक आणि निष्ठावान कार्यकर्त्यांवर

✒️सचिन महाजन(तालूका,प्रतिनिधी हिंगणघाट)मो:-9765486350

हिंगणघाट(दि.26ऑक्टोबर):-ज्या जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या लाखो अनुयायांना बौद्ध धम्माची दीक्षा देऊन संपूर्ण देशात सामाजिक क्रांतीची मशाल पेटविली. त्या महामानवाला अभिवादन करण्यासाठी दिनांक २५ ऑक्टोम्बर २०२० रोजी धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या अनुशंगाने समता सैनिक दल शाखा वडनेर यांच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पृणाकृति प्रतिमेजवळ सकाळी ९.०० वाजता कर्तव्यदक्ष पोलिस शिपाई मा.लक्ष्मण केंद्रे पो.स्टे. वडनेर यांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पृणाकृति प्रतिमेस माल्यार्पण करून धम्मवंदना घेऊन डॉ बाबासाहेब आंबेडकर द्वारा स्थापित समता सैनिक दलानी सर्वप्रथम (सॅलुटेशन) मानवंदना देऊन प्रतिबद्धतेची शपत घेतली.

व त्या वेळी शाखा संघटक, वैभव सावज, ट्रेनिंग ऑफिसर निलेश भगत, सहसंघटक अंगिरस जारोंडे, शाखा बौद्धिक प्रमुख प्रीतम तागडे, प्रतीक पाटिल ऋतिक पुड़के आदेश तेलतुंबड़े प्रतीक पुड़के अभिजीत डोंगरे अमित कुंभारे संदेश जारोंडे कुणाल जारोंडे व समता सैनिक दलाचे तालुकाध्यक्ष वैभव फुलझेले व विरभगतसिंग विद्यर्थि परिषद हिंगणघाट तालुका कार्याध्यक्ष गणेश शेळके उपस्थित होते.