मुल तालुक्यातील शिवसेनेचे प्रमुख कार्यकर्ते राष्ट्रवादीत

31

✒️राहूल डांगे(विशेष प्रतिनिधी)मो:-9850801314

मुल(दि.27ऑक्टोबर):- मुल शहर शिवसेनेचे माजी अध्यक्ष श्री भास्कर खोब्रागडे, शिवसेनेचे माजी उपतालुका प्रमुख श्री.संदीप चिताडे,युवा आघाडीचे श्री.सतीश केंद्रे,श्री.हरिदास मेश्राम, यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्री राजेंद्र वैद्य राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते तथा OBC विभागाचे प्रदेश सरचिटणीस श्री हिराचंद बोरकुटे,राष्ट्रवादी मीडिया सेलचे जिल्हाध्यक्ष श्री नितीन पिंपळशेंडे तालुका अध्यक्ष श्री.गंगाधर कुनघाडकर,विधानसभा अध्यक्ष श्री सोनल मडावी,महिला तालुकाध्यक्ष सौ.निता गेडाम,शहर महिला अध्यक्ष सौ.अर्चनाताई चावरे,यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

या प्रसंगी अनेक शाखा प्रमुख त्यात प्रामुख्याने श्री राहुल बारसागडे,श्री.राहुल चौखुंडे,श्री.नितेश गेडाम,सूरज गुज्जनवार,अश्विन खोब्रागडे,शामराव वाळके,गुरुदास शेरकी,सुहास चटारे,सुनील वाकुडकर,निखिल कोवे,प्रणय दंडमवार,गजानन पोहनकर,राकेश गेडाम,विवेक रामटेके,जाफर सैय्यद,चंदू सिडाम,लकी कुमार,उमेश नागोरो,उमेश पुरी मुल शहरातील वार्डा वार्डातील अनेक महिला कार्यकर्त्यांनी सुद्धा आज एका कार्यक्रमात प्रवेश केला.

या प्रसंगी जिल्हाध्यक्ष श्री राजेन्द्र वैद्य यांनी राष्ट्रवादीचे दुपट्टे घालून या सर्वांचे राष्ट्रवादी पक्षात स्वागत केले. या पक्ष प्रवेशामुळे मुल शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अधिक बळकटी प्राप्त होईल व आगामी नगर परिषद निवडणुकीच्या दृष्टीने हा पक्ष प्रवेश सोहळा महत्वाचा असल्याचे मत जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य यांनी व्यक्त केले.येत्या डिसेंबर महिन्यापर्यंत मुल शहरातील सर्व 17 वार्डांच्या कार्यकारिणी व वार्ड निहाय बैठकांचे सुद्धा नियोजन आज या बैठकीत करण्यात आले.