जर्नलिस्ट एक्टिविजम फोरम च्या वतीने कोविड -19 बाबत जमिनीस्थरावर कार्य करणाऱ्याचा सन्मान

35

✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

ब्रम्हपुरी(दि.28ऑक्टोबर):-जर्नीलिस्ट एक्टिविजम फोरमचे जिल्हा अध्यक्ष कृपाकर चहांदे याच्या मार्फतीने कोविड -19 बाबत जमिनीस्थरावर कोरोना महामारीच्या संकटात प्रसंगावधान, साहस, ध्यर्य तत्परता ,दाखवत आपल्या परिसरात कोविड-19बाबत जनजागृती केली. सोबतच कोरोनाची साथ आटोक्यात आणण्यासाठी स्टेहोम चा संदेश दिला, प्रबोधन करत जमिनीस्थरावर मदत कार्य केले. अशा व्यक्तींचे जर्नीलिस्ट एक्टिविजम फोरमच्या वतीने जिल्हा अध्यक्ष कृपाकर चहांदे याच्या हस्ते 25 व्यक्तींना शाल, श्रीफळ व सन्मानपत्र देवून सन्मानित करण्यात आले. त्यात आशा सेविका, समाजिक कार्यकर्ते, पत्रकार यांचा समावेश होता.

प्राथमिक आरोग्य उपकेंद्र चौगान येथे आयोजित या कार्यक्रमाला अध्यक्ष मा. विलास दुधपचारे तालुका आरोग्य अधिकारी, उपाध्यक्ष डाॅ प्रशांत चौधरी, प्रमुख अतिथी म्हणून मा. गोवर्धन दोनाडकर पत्रकार देशोन्नती ब्रम्हपुरी, राहुल मैद पत्रकार सकाळ, माजी सभापती रविभाऊ मेश्राम, सुधाकरजी महाडोरे सामाजिक कार्यकर्ता, निकोसे साहेब आरोग्य सहायक अधिकारी, अँड. धोटे चौगान, मधुकर घुले ग्रामविस्तर अधिकारी चौगान, सरस्वती धोटे अंगवाडी सेविका, प्राथमिक आरोग्य केंद्र चौगान अंर्तगत संर्पुण आशा वर्कर आरोग्य केंद्र मधिल सर्व कर्मचारी उपस्थीत होते.

जर्नलिस्ट फोरम महाराष्ट्रभर समाजात मदत कार्य करीत आहेच त्याव्यतीरीक्त संकटकाळी मदतीला धावून जाणाऱ्या लोकांचेही सन्मान होणे गरजेचे आहे.कारण सन्मान आणि कार्याची दखल ही माणसाला असे काम करायला अजून प्रेरित करते त्यासाठी फोरम अशा व्यक्तीचे सन्मान करीत आहोत. असे फोरम चे कृपाकर चहानदे यांनी संगीतले.हा अनोखा आणि गरजेचा उपक्रम होता तसेच तालुक्यात पहिला आणि वेगळा उपक्रम आहे असे तालुका आरोग्य अधिकारी यांनी कार्यक्रमच्या वेळी संगीतले.

कार्यक्रमाचे संचालन रुपेश निहाटे सर व आभार प्रदर्शन अशोक तोंडरे सर यांनी केला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्राथमिक आरोग्य चौगानचे कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले.