महाराजस्‍व समाधान योजने अंतर्गत शिबीराचे आयोजन करुन कुंडलवाडी परिसरातील शेतक-यांचे प्रश्‍न सोडवू – तहसिलदार कैलासचंद्र वाघमारे

30

✒️अशोक हाके(बिलोली,तालुका प्रतिनिधी)मो:-9970631332

बिलोली(दि.30ऑक्टोबर):-तालुक्यातील कुंडलवाडी येथील महाराजस्‍व योजने अंतर्गत अथवा जनात शिबीराच्‍या माध्‍यामातुन कुंडलवाडी व परिसरातील शेतक-यांचे प्रलंबीत प्रश्‍न सोडवण्‍यात येतील असे येथील कै.सुमनबाई रामनाथ कत्रुवार संस्‍थेच्‍या कार्यालयात सत्‍कार समारंभात बोलताना बिलोलीचे तहसिलदार कैलासचंद्र विठठलराव वाघमारे म्‍हणाले.कुंडलवाडीचे भूमीपुत्र तहसिलदार कैलासचंद्र विठठलराव वाघमारे यांच्‍ाा मित्र परिवाराच्‍या वतीने आयोजित स्‍त्‍कार समारंभाच्‍या कार्यक्रमाचे अध्‍यक्ष तहसिलदार वाघमारे तर प्रमुख पाहुने म्‍हणुन येथील ठाण्‍याचे सहायक पोलिस निरिक्षक सुरेश मांटे हे होते.

भूमी पुत्राच्‍या सत्‍कारा समई काही शेतक-यांनी व नागरिकांनी प्रश्‍न उपस्थित केले की,या ठिकाणी मंडळाधिकारी कार्यालय नावालाच असुन या कार्यालयाअंतर्गत तलाठी नियमितपणे कार्यालयीन वेळेत ठरवलेल्‍या सज्‍जेच्‍या ठिकाणी उपस्थित राहात नसल्‍याने शेतक-यांना आपली शेतीचे कामे सोडून तलाठी व मंडळधिका-यांना मोबाईलवर शेाधण्‍याची वेळ येत असल्‍याने या प्रश्नाकडे तात्‍काळ लक्ष घालावे.

अशी अपेक्षा उपस्थितांनी व्‍यक्‍त केली असता उपस्थित तहसिलदार कैलासचंद्र वाघमारे यांनी निश्चितच या भागातील महसुल क्षेत्रातील प्रलंबित प्रशनाविषयी लक्ष घालुन जनता शिबीराचे आयोजन अथवा समाधान योजने च्‍या शिबीराचे आयोजन करण्‍यात येईल असे सांगून नागरिकांनी तथा शेतक-यांनी आपल्‍या प्रलंबित प्रशनाविषयी माझयाशी सपंर्क साधावे तसेच शहर व परिसरातील शेतक-यांच्‍या प्रलंबित प्रश्‍न ता‍त्‍काळ सोडवण्‍यात येईल असे सांगितले.

शहरातील महसुल प्रशन तसेच शेतक-यांच्‍या आडीआडचणीकडे तलाठी दूर्लक्ष करित असल्‍याने तहसिलदार आपल्‍या गावाचे आल्‍याने कार्यालयीन कामांना गती येवून आपले काम लवकर मार्गी लागतील अशी अपेक्षा नागरिकांतून व्‍यक्‍त होतना दिसत होते.तहसिलदार कैलासचंद्र विठलराव वाघमारे यांचा सत्‍कार शहरातील पोलिस ठाण्‍याच्‍या वतीने सहायक पोलिस निरिक्षक सुरेश मांटे , कै.सब्‍बनवार विद्यालयाचे संस्‍थापक तथा माजी उपनगरध्‍यक्ष गंगाधरराव सब्‍बनवार यांच्‍या निवास्‍थानी तर नगरसेवक पंढरीसेठ दाचावार यांच्‍या निवास्‍थानी छोटेखानी सत्‍कार करण्‍यात आला.

तहसिलदार कैलासचंद्र वाघमारे, सुरेश मांटे ,व्‍ही.के, सर यांचा सत्‍कार प्रा.जयप्रकाश कमटलवार,गणेश कत्रुवार, अशोक हाके, राजू लाभशेटवार,साईनाथ कत्रुवार, गंगाधर झंपलकर, रमेश भोरे, रविंद्र भोरे,साईनाथ गांजरे,यश कत्रुवार,शंकर मदिकुंटावार,भगवान पेंडकर,दतू शिवशेटे, यांनी केले. तर कार्यक्रमाचे सुत्र संचलन प्रा. जयप्रकाश कमटलवार तर आभार प्रदर्शन गणेश कत्रुवार यांनी केले.