केंद्र सरकार शेतकरी विरोधीच-विजयकुमार भोसले

90

✒️कुंभोज (पुरोगामी संदेश नेटवर्क)

कुंभोज(दि.31ऑक्टोबर):-केंद सरकार सामान्य माणसाच्या आयुष्यात अंधार पसरविण्याचे काम करीत आहे. केवळ भाषणबाजी करणारे सत्ताधारी शेतकरी विरोधी आहे,नुकतेच केन्द्र सरकारने शेतकरी विरोधी बिल तयार केले आहे, या बिलामुळे शेतकऱ्यांचे मरण निश्चित आहे,शेतकऱ्यांना दुःखाचा खाईत लोटणारे बिल त्वरित रद्द करण्यात यावे,अशी मागणी विजयकुमार भोसले(महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी (अनुसूचित जाती विभाग)प्रदेश समन्वयक, प्रभारी सातारा जिल्हा) यांनी केली आहे.

केंद्रातील भाजपा सरकारने असंविधानिक रितीने जे अन्यायकारक शेतकरी विधेयक बिल पारीत केलेय, त्या बिलास भोसले यांनी विरोध करत असल्याचे सांगितले.
या बिलामुळे शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान होणार आहे.या बिलामध्ये किमान आधारभूत किंमत शेतकऱ्याला नसणार आहे.शेतकऱ्याची व्यापाऱ्याकडून जर फसवणूक झाली तर त्यास तक्रार करता येणार नाही. असे अनेक मुद्दे व जाचक अटी या बिलामध्ये समाविष्ट आहेत.या मुळे शेतकरी देशोधडीला जाणार आहे.हे बिल सरकारने बिनशर्त रद्द करावे अशी मागणी करण्यात आली आहे.

प्रसिद्धी पत्रकात पुढे म्हटले आहे की, ।।शाई कलम से लिखा तुमने काला कानुन।
हम पसीने की रोशनाई से इतिहास लिखेंगे।।
शेतकरी विरोधी बिल रद्द करण्यात यावे,याकरिता आंदोलन करण्यात येणार असल्याचे भोसले यांनी सांगितले.