ब्रम्हपुरीचे उदयकुमार पगाडे यांना “स्व. इंदिरा गांधी सेवारत्न राष्ट्रीय पुरस्कार २०२०” जाहीर

42

🔹गोल्डन केअर क्लब, बंगळूर मार्फत पुरस्कार सोहळा संपन्न

✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

ब्रह्मपुरी(दि.1नोव्हेंबर):-दि.31ऑक्टोम्बर २०२० रोजी शनिवारला भारताची प्रथम महिला पंतप्रधान, तथा आयर्न लेडीज म्हणून जगविख्यात असलेली महिला “स्व. इंदिरा गांधी” यांच्या पुण्यतिथीचा दिवस होता.

याच निमित्ताने आपल्या चंद्रपूर जिल्यातील ब्रम्हपुरीतील रहिवासी, युवा नेतृत्व, सदैव एकत्रित पणे सर्वांशी मिळून वेगवेगळ्या सामाजिक कार्यात सहभागी होऊन समाजकार्य करणारे मा.उदयकुमार सुरेश पगाडे (वय-२६) यांना काल, कर्नाटक राज्यातील बंगळूर येथील “गोल्डन केयर क्लब” संस्थे मार्फत सामाजिक कार्यात आगळी वेगळी कामगिरी केल्याबद्धल “स्व.इंदिरा गांधी_ सेवारत्न पुरस्कार-२०२०” हा राष्ट्रीय पुरस्कार आनलाईन स्वरूपात प्रदान करण्यात आला.