गोंडपीपरी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष पदी राजेश कवठे तर तालुका कार्याअध्यक्ष पदी नितेश मेश्राम यांची नियुक्ती

26

✒️राहुल डांगे(विशेष प्रतिनिधी)मो:-9850801314

गोंडपीपरी(दि.2नोव्हेंबर):-येथिल शासकीय विश्रामगृहात राष्ट्रवादी कार्यकर्त्या ची बैठक झाली.या बैठकीत गोंडपीपरी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष पदी राजेश कवठे तर तालुका कार्याअध्यक्ष पदी नितेश मेश्राम यांची नियुक्ती करण्यात आली.

बैठकीला राष्ट्रवादी जिल्ह्या अध्यक्ष राजेंद्रजी वैध ,तालुका निरीक्षक शरदजी मानकर, सहकार महर्षी श्री बाबासाहेब वासाडे जी ,रमेशजी मखेजा ,जेष्ठ नेते उराडेजी गोंडपीपरी चे जेष्ट नेते श्री वाघ मामाजी जिल्हा उपाध्यक्ष ,जेष्ट नेते अरूनजी वासलवार अध्यक्ष पत्रकार संघ गोंडपीपरी,राजुरा विधानसभा युवक अध्यक्ष कुणाल गायकवाड ,जिल्हा सचिव ऋषि भाऊ हेपट ,ऍड .काळे साहेब ,जेष्ट नेते बाबुराव जी बॉंडे , गोंडपीपरी शहर युवक अध्यक्ष संदिप ईटेकर युवक उपाध्यक्ष जयेश कार्पेनवार ,माजी तालुका अध्यक्ष मनोज धानोरकर,ओबीसी तालुका अध्यक्ष कुळे सर , सोशल मीडिया अध्यक्ष आशिष मुंजनकर,विलास पामुलवार आदी उपस्थित होते.