दिव्यांगांचे आजचे आंदोलन चिरडण्याचा पोलिसांचा डाव

36

🔺आंदोलनकर्ते राहुल साळवे यांच्या घरी मध्यरात्री जाऊन बजावली नोटिस

✒️माधव शिंदे(नांदेड,जिल्हा प्रतिनिधी)मो:-7757073260

नांदेड(दि.2नोव्हेंबर):- बेरोजगार दिव्यांगांच्या सामाजिक न्याय हक्कासाठी आज दि २ नोव्हेंबर २०२० रोजी बेरोजगार दिव्यांग कल्याणकृती संघर्ष समीतीचे अध्यक्ष राहुल सिताराम साळवे यांनी विद्रोही आंदोलनाची तसेच शासकीय अधिकाऱ्यांना रताळे व दिव्यांग साहित्य ज्यात काठ्या – लाठ्या, कुबड्या,अंध चष्मे भेट देणार असल्याचे निवेदन भारताचे महामहीम राष्ट्रपती.मा.पंतप्रधान.मा.राज्यपाल आणि मा.मुख्यमंत्री यांना एका निवेदनाद्वारे म्हटले होते तसेच स्थानिक पातळीवर असलेल्या संबंधित सर्व शासकीय कार्यालयांना हि निवेदन सादर केले होते.

राहुल साळवे यांनी पुकारलेल्या या आंदोलनाला सर्वच दिव्यांग संघटणांनी जाहिर पाठिंबा देत शेकडोंच्या संख्येत सहभागी होणार असल्याचे निवेदन सादर केले. दि ९ आक्टोंबर ते १२ आक्टोंबर दरम्यान सर्वांना निवेदने देऊन हि स्थानिक जिल्हा प्रशासनाकडुन कुठलीच गंभीर दखल न घेता दि २१ आक्टोंबर २०२० रोजी सर्व संबंधित विभागांना दिव्यांगांच्या मागण्या संदर्भात अत्यंत तातडीचे पत्र काढुन २९ आक्टोंबर २०२० पर्यंत अहवाल सादर करण्याचे निर्देश मा.जिल्हाधिकारी नांदेड यांनी दिले होते 

परंतु दरवेळेस प्रमाणेच याहि वेळेस जिल्हा भरातील दिव्यांगांची दिशाभूलच करण्यात आली कारण संबंधित विभागांनी कोरोना या महामारीमुळे उपासमारीची वेळ आलेल्या दिव्यांगांबाबत कुठलेच ठोस निर्णय घेतले नाहीत त्यामुळे जिल्हा भरातील शेकडो दिव्यांगांवर अशा संकट काळात हि अन्यायच करण्यात आला आहे.खरे पाहता सर्व स्थानिक स्वराज्य संस्था आणि नागरी स्वराज्य संस्था यांच्याकडील दिव्यांगांचा राखीव निधी कोट्यवधी रूपये हा अखर्चीतच आहे तसेच प्रत्येक आमदार आणि खासदार यांच्या विकास निधीतून हि दिव्यांगांसाठी निधी अखर्चितच आहे.

दिव्यांग सुधारीत कायदा २०१६ सुद्धा कागदावरच आहे यासह ईतर सर्व शासन निर्णयांना सुद्धा केराचीच टोपली दाखविण्यात आली आहे परीणामी शेकडो दिव्यांग शासनाच्या विविध योजनांपासून वंचीतच राहिलेला असतांना जिल्हा प्रशासनाकडुन अकलेचे तारे तोडत लोकशाही मार्गाने आंदोलनाच्या माध्यमातून शेकडो दिव्यांगांना न्याय मिळवू पाहणा-या राहुल सिताराम साळवे यांच्यावर पोलिस प्रशासनाचा दबाव आणत काल दि १ नोव्हेंबर २०२० रोजी मध्यरात्री ११:५६ वाजता पोलिस फौजफाट्यासह राहुल साळवे राहत असलेल्या विष्णुनगर नांदेड येथील त्यांच्या राहत्या घरी नोटिस घेऊन आले.

असता राहुल साळवे यांचे वयोवृद्ध आई वडील यांच्याशी दमछाकि करत दडपन आणत या नोटिसवर राहुलची सहि आना अन्यथा आम्हाला तुमच्या मुलाला आंदोलनापासून परावृत्त करण्यासाठी कष्टिडीमध्ये घ्यावे लागेल असे म्हणत तासभर बोलाबाली केली.असे मध्यरात्री तुम्ही पोलिस येऊच कसे शकता म्हणत राहुल साळवे यांची ६७ वर्षीय वयोवृद्ध आई सौ.लिलावती सिताराम साळवे आणि ७६ वर्षीय वयोवृद्ध वडिल श्री.सिताराम मेसाजी साळवे यांनी माझ्या मुलाला अटक केल्यास आम्ही दोघेही तुमच्याच पोलिस ठाण्यात येऊन आत्मदहन करणार असा टाहो फोडला परंतु पोलिसांनी आपल्या बळाचा वापर करत राहुल साळवे यांच्याकडुन त्या आंदोलनापासून परावृत्त होण्याच्या नोटिसवर सहि घेतलीच हा सर्व प्रकार रात्री एक ते दीड वाजेपर्यंत चालला.

गल्लीतील सर्व लोक एकत्रीत येऊन साळवे यांच्या बाजुने ऊभे राहिले.राहुल साळवे पुढे म्हणाले की आजही लोकशाही जीवंत आहे जिल्हा प्रशासनाने किती हि जोर जबरदस्ती केली.तुरूंगात हि डांबले तरी दि २ नोव्हेंबर २०२० रोजीचे आमचे नियोजित विद्रोही आंदोलन होणारच असल्याचे एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.