आमदार समीर कुणावार यांनी केला शेत शिवार पाहणी दौरा

33

🔸शेतकऱ्यांची समस्या मांडणार प्रशासन दरबारी

✒️इकबाल पैलवान(हिंगणघाट प्रतिनिधी)मो:-9923451841

हिंगणघाट(दि.3नोव्हेंबर):- तालुक्यातील पोहणा,वडनेर,सोनेगांव,फुकटा सर्कलमधील कपाशीचे झालेल्या नुकसानीसंदर्भात सर्वेक्षण करण्याकरीता काल दि.२ रोजी महसुल तसेच कृषी अधिकाऱ्यांसह आ. .समिरभाऊ कुणावार यांचा शेतीशिवारात पाहणीदौरा आयोजित करण्यातआलायावेळी तालुका कृषी विभागाचे उपविभागीय अधिकारी घोड़मारे,कृषी अधिकारी मेश्राम,नायब तहसिलदार पठाण तसेच संबंधित विभागाचे तलाठी उपस्थित होते.

हिगणघाट तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये वडनेर, आजनसरा,फुकटा आणि पोहणा येथे अनेक ठिकाणी बांधावर भेटी देऊन बोंडअळीचा मोठया प्रमाणात प्रादुर्भाव झालेल्या कपासाची पाहणी केली.भेटी दिलेल्या भेटिमधे मोठ्या प्रमाणामध्ये कपाशी बोंड हे बोंडअळीच्या ७० % सडले असल्याचे निदर्शनास आले असून उर्वरित ३०% बोंडेसुद्धा बोंडअळीने प्रभावित झाल्याचे दिसुन येत आहे.

त्यामुळे आता कपाशी संपूर्णतः नष्ट झाल्याचे दिसुन आले असून बळीराजा मात्र चिंताग्रस्त दिसुन येत आहे. शासनाने याची तात्काळ दखल घेऊन सरसकट पंचनामे करीत उध्वस्त झालेल्या बळीराजास मदत करावी अशी सर्वत्र मागणी आहे.

महसूल यंत्रणा तसेच कृषी विभागाची चमु सोबत होते आणि सर्व शेताची पाहणी केल्यानंतर कपाशीचे पिक संपूर्णतः शंभर टक्के नष्ट झाल्याचा निष्कर्ष आहे, सोयाबीनचेसुद्धा निसर्गाचे लहरीपणामुळे नुकसान झाले असून अनेक शेतकऱ्यांनी उभ्या शेतात रोटावेटर फिरवला आहे.

सोयाबीन पाठोपाठ आता कपाशीसुद्धा १००% हातून गेलेली आहे .पीडित शेतकऱ्यांना शासनाने तातडीने मदत करावी यासंदर्भात आ. कार्यसम्राट समीरभाऊ कुणावार हे शासनाकडे पाठपुरावा करणार असून काल त्यांनी जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांचेशीसुद्धा भ्रमणध्वनीद्वारे चर्चा केलेली आहे.

उपरोक्त प्रकरणी आज ३ रोजी मा.आमदार कार्यसम्राट समिर भाऊ कुणावार जिल्हाधिकाऱ्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन शेतीकऱ्यांची कैफियत निवेदन देऊन मांडणाऱ आहेत. नुकसानग्रस्त भागातील तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्याची मागणी यावेळी ते करणार आहेत.