एच.ए.एल अँप्रेंनटीसशीप च्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसंदर्भात मनसेच्या शिष्ठ मंडळाने घेतली खासदार डॉ.भारतीताई पवार यांची भेट

29

✒️निफाड(पुरोगामी संदेश नेटवर्क)

निफाड(दि.3नोव्हेंबर):- हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड ओझर नाशिक एच ए एल या कंपनीमध्ये विद्यार्थी अँपरेंटीसशीप चे शिक्षण घेत आहे आणि ह्या ट्रेनिंगचा कार्यकाळ हा १ वर्षाचा असतो.पण वाढत्या कोरोनाच्या प्राधुर्भावामुळे लॉकडाउन झालं आणि विद्यार्थ्यांना येण्यास मनाई होती.

ह्या लॉकडाउन मध्ये विद्यार्थी जितक्या दिवस कंपनीमध्ये आले नाही तितक्या दिवस पुढे त्यांना ट्रेंनिगची मुदतवाढ केली जात आहे.ह्यामुळे विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जात आहे आणि ह्या मुदतवाढीमुळे पुढची भरती देखील लांबणीवर जाईल.

शैक्षणिक क्षेत्रातील सर्व विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे
तरी आपण मुदतवाढ न करता त्यांना आपण ट्रेनिंग पूर्ण झाल्याचं सर्टफिकिट आणि वेतन दयावे ही मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने निफाड तालुका अध्यक्ष शैलेश शेलार व कार्यकारी मंडळाने केली आहे.