ओबीसी विविध संघटनानी संयुक्त सादर केले निवेदन सादर

39

🔹ओबीसी आरक्षण व जातनिहाय जनगणना हा प्रमुख मुद्दा

✒️इकबाल पैलवान(हिंगणघाट प्रतिनिधी)मो:-9923451841

हिंगणघाट(दि.4नोव्हेबर):-संपूर्ण महाराष्ट्रात दि ३ नोव्हेबर ला जिल्हाधिकारी तसेच उपविभागाचे तहसीलदारांना ओबीसीच्या विविध संघटना आणि ओबीसी मधील जात संघटना व्दारे, ओबीसी समाजाच्या न्याय मागण्यांसाठी एल्गार आंदोलन करण्यात आले.यात ओबीसी समाजाची जात गणना केंद्रीय सरकारचे करावी आणि केंद्रीय सरकार करीत नसेल तर महाराष्ट्र शासनाने करावी,तसेच लवकरात लवकर महाज्योती योजनेसाठी ५०० कोटी रू निधी महाज्योतीच्या खात्यात जमा करावी.

ओबीसी शेतकऱ्यांना एससी एसटी प्रमाणे निधीची तरतूद करावी, महाराष्ट्रातील सर्व प्रर्वगांच्या साठी स्पर्धा परीक्षा, पोलिस भरती, आणि इतर नौकरी भरती कुणाच्या ही दबावाला बळी न पडता त्वरीत सुरू करावी. ओबीसी विद्यार्थ्यांनासाठी ७२वस्तीगृह कीरायाच्या इमारती मध्ये सुरू करावी, ओबीसी विद्यार्थ्यांनाची थकीत स्कालरशीप त्वरीत वितरीत करावी , महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न देण्यात यावे.

ओबीसी आर्थिक विकास महामंडळाला ओबीसी लोकसंख्येच्या प्रमाणात निधी वाटप करावे, या शिवाय ओबीसींच्या इतर मागण्यांकडे मंत्रीमंडळाच्या उपसमीतीने त्वरीत निर्णय घ्यावा. अन्यथा दि १० नोव्हेबर रोजी मुंबई येथे होणाऱ्या ओबीसी गोलमेज परिषदेत महाराष्ट्रातील सर्व ओबीसी समाज दि ७ डिसेंबर रोजी विधान परीषदेला घेराव करणार आहेत.

ओबीसी समाज आता आरपार ची लढाई करायला सज्ज झाला आहे,एका जातीच्या दबावाला शासन बळी पडत असल्याने रोष व्यक्त होत आहे. ओबीसी समाज संविधानाला मानणारा समाज आहे,फक्त लोकसंख्येच्या आधारावर नव्हे तर बॅलेटचाही विचार करावा लागेल.

या निवेदन आंदोलनात राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे जिल्हाध्यक्ष प्रा. शेषराव येरलेकर, भूषण पिसे, रोहित हरणे, शैलेश मैंद ,दिनेश काटकर,प्रकाश राऊत, सुनील डोंगरे, राजू मंगेकर, ऋषभ राऊत, सौरभ हिवसे, ऋतिक मोघे, प्रज्वल ठाकरे, गौरव गुधडे, प्रमंशू डहाके, सूरज वरघने, गोपाल मांडवकर, नितीन भोसले,संतोष खाडे,अजय बिरे, हर्षल आंबटकर,सूरज टिपले,रोशन हुडे,मधुकर कुटे,शुभम कलोडे,अक्षय इंगोले,इशांत कोल्हे व इतर उपस्थित होते.