अंघोळी साठी गेलेल्या युवकाचा बुडून मृत्यू

28

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)मो:-8698566515

गंगाखेड(दि.4नोव्हेंबर):- येथे नियमित अंघोळीसाठी जाणाऱ्या युवकाचा गोदावरी नदीपाञात युवकाचा बुडून मृत्यू झाल्याची घटणा खडकपुरा गल्ली गंगाखेड येथील कचरोबा सोपान आढाव वय ४२ वर्षे हा अंघोळीसाठी गेला असताना दुपारी बाराच्या सुमारास गोदावरी नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना झाली असून उपजिल्हा रुग्णालय गंगाखेड येथे शवविच्छेदन करुन नातेवाईकांच्या ताब्यात दिले.

शहरातील भगवती चौकातील नखत यांच्या किराणा दुकानावर मजूर म्हणून काम करत होता. गंगाखेड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्याच्या पश्चात पत्नी दोन मुली एक मुलगा भाऊ व जावई असा परिवार आहे त्याच्या अचानक झालेल्या निधनामुळे परिसरामध्ये हळहळ व्यक्त करत आहेत.