भाजपा चे आमदार अभिमन्यू पवार यांच्यावर देशद्रोहाचा गुंन्हा दाखल करनार.- पँथर डॉ. राजन माकणीकर

32

✒️मुंबई(पुरोगामी संदेश नेटवर्क)

मुंबई(दि.6नोव्हेंबर):-चित्रपट अभिनेता अमिताभ बच्चन व सोनी टेलिव्हिजन नेटवर्क विरोधात दिलेली तक्रार ही मनुस्मृतीचे समर्थन करणारी असून भाजपा आमदार अभिमन्यू पवार यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करनार असल्याची माहिती डॉ राजन माकणीकर यांनी दिली.

पँथर ऑफ सम्यक योद्धा या संघटनेचे राष्ट्रीय महासचिव व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक या पक्षाचे केंद्रीय महासचिव व सल्लागार पँथर डॉ राजन माक्निकर यांनी पक्ष व संघटनेच्या वतींने सोनी टेलिव्हिजन नेटवर्क व अमिताभ बच्चंन चे जाहीर अभार अभिनंदन व्यक्त केले असून असे ऐतिहासिक प्रश्न नेहमी विचारले जावेत अशी आशा व्यक्त करून 25 दिसेम्बर मनुस्मृती दहन दिनी संविधान चौक सीपझ गाव मुंबई येथे मनुस्मृती दहन करणार असल्याची माहिती देऊन ज्यांना संविधान मान्य नाही अस्यांनी खुशाल भारत सोडून जावा असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

संविधानावर चालणाऱ्या भारतात राहून संविधानाचा विरोध करून मनुस्मृतीचे समर्थन करणाऱ्या माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्वीय सहाय्यक व लातूर जिल्ह्यातील औसा विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले भाजपा आमदार अभिमन्यू पवार यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करणार असल्याचेही सांगितले आहे.

समविधान विरोधी, देशद्रोही कारवाया करणार्या नाजाईज  मनुवादी पिलावळ देशात तोंड वर काढत असून बौद्ध धर्मगुरू पूज्य भदंत शिलबोधी, रिपाई अध्यक्ष कनिष्क कांबळे यांच्या नेतृत्वाखाली पँथर श्रवण गायकवाड, पँथर राजेश पिल्ले, पँथर सचिन भूटकर, समाजसेवक वीरेंद्र लगाडे, कायदेशोर सल्लागार नितीन माने आदींचे शस्तमंडल वारंवार घडलेल्या घटनेवर पँथर ऑफ सम्यक योद्धा, सम्यक मैत्रेय फौंडेशन, रिपाई डेमोक्रॅटिक च्या वतीने तक्रार देऊन कायदेशीर कारवाई करणार असल्याचेही डॉ.माकणीकर यांनी सांगितले.