✒️अशोक हाके(बिलोली,तालुका प्रतिनिधी)मो:-9970631332
कुंडलवाडी(दि.9नोव्हेंबर):-येथील प्रभाग क्र.७ मधील नगरसेविका शकुंतलाबाई गंगाधरराव खेळगे यांनी स्वखर्चातुन प्रभागात बोअर मारून नळाद्वारे नागरिकांच्या घरी पाणीपुरवठा करून दिल्याने गत २० वर्षापासूनचा पाणीप्रश्न सुटल्याने प्रभागातील नागरिक समाधान व्यक्त करीत आहेत.
शहरातील प्रभाग क्र.७ मधील नगरसेविका शकुंतलाबाई खेळगे यांनी नगरपरिषद निवडणूक वेळी प्रभागातील पाणीप्रश्न सोडवण्यासाठी दोन बोअर स्वखर्चातुन मारण्याचे आश्वासन दिले होते.दिलेल्या आश्वासनाची परिपुर्ती करीत प्रभागात दोन बोअर मारून मोटार बसवुन दिले.तसेच बोअरचे पाणी प्रभागातील नागरिकांच्या घरी नळाद्वारे पाणीपुरवठा सुरू केला.
त्याचे उदघाटन नगराध्यक्षा सुरेखा नरेंद्र जिठ्ठावार यांच्या हस्ते गत महिन्यात करण्यात आले.प्रभागात नगरपरिषद निवडणूक वेळी दिलेले आश्वासन नगरसेविका शकुंतलाबाई खेळगे यांनी पाळून प्रभागातील पाणीप्रश्न मिटविला.त्यामुळे प्रभागातील नागरिक समाधान व्यक्त करीत आहेत.