भारतीय बौद्ध महासभा पुसदच्या वतीने बाळासाहेब ढोले यांचा सत्कार

40

✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

पुसद(दि.9 नोव्हेंबर)-दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा पुसदचे कार्य प्रसिद्धीच्या माध्यमातून सुमारे दोन ते अडीच वर्षापासून संपूर्ण जिल्ह्यात नावलौकिक मिळवून देणारे प्रचार व पर्यटन तालुका सचिव (तालुका प्रसिद्धीप्रमुख )तसेच पुसद तालुक्यातील मांडवा येथील या ग्रामीण भागातील समस्या प्रसिद्धीच्या माध्यमातून मांडणारे बाळासाहेब उर्फ बाळू नथ्थुजी ढोले यांच्या कार्याची दखल घेत ग्रीन फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष अमितभाऊ जगताप व जिल्हाध्यक्ष अमोल भालेराव यांनी बाळासाहेब ढोले यांना २०२० राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकार या पुरस्कारांने २५ ऑक्टोंबर २०२० रोजी सन्मानित केल्याबद्दल दि बुद्धीष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा पुसद यांनी विद्यार्थीदिनाचे औचित्य साधून स्थानीय बुद्ध विहार महाविरनगर येथे बाळासाहेब ढोले यांचा सत्कार घेण्यात आला .

सर्वप्रथम तथागत गौतम बुद्ध व प. पू. बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवांच्या प्रतिमा पूजन करून सामूहिक त्रिशरण पंचशील घेण्यात आले.

यावेळी मनोज कांबळे, तालुकाध्यक्ष माजी सैनिक भारत कांबळे, भीम आर्मी विदर्भ उपाध्यक्ष बुध्दरत्न भालेराव,भीम आर्मी जिल्हाध्यक्ष अशोक भालेराव, जिल्हा सचिव श्याम देवकुळे, भीम आर्मी मुख्य महासचिव धनराज कांबळे, महासचिव प्रसाद खंदारे, भीम आर्मी तालुका संघटक गोपाल जगताप, किसन धुळे ,संतोष सोनोने,ल.पु. कांबळे, मानोरा भारतीय बौद्ध महासभा शहराध्यक्ष राजू मोहाडे, भारतीय सैनिक शरद कांबळे, विदर्भ रनिंग चॅम्पियन शंकर धुळे, विनोद कांबळे ,बाळासाहेब इंगोले, संदीप कांबळे , प्रणव भागवत विक्रांत डाके, विपुल भवरे ,उमेश बरडे,सत्यजित भगत,भिम आर्मी पुसदचे कार्यकर्ते, भारतीय बौद्ध महासभा महिला शाखा महावीर नगर ,गांधीनगर ,शिवाजी वार्ड ,सुभाष वार्ड, सुदर्शन नगर, पारमिता महिला मंडळ महाविर नगर तसेच इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

या प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये बाळासाहेब ढोले यांना पुष्पगुच्छ, शाल, सन्मानचिन्ह देऊन यथोचित सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाषण प्रल्हाद खडसे यांनी केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तुकारामचौरे यांनी केले .तरआभार माजी सैनिक धम्मपाल पडघणे यांनी केले.
या कार्यक्रमाची सांगता सरणतय गाथेने करण्यात आली.