प्रलंबित शौचालयाचे अनुदान मिळण्यासाठी युवा मित्र मंडळ तसेच लाभार्थी ग्रामस्थ पुसला यांनी ग्रामपंचायत मधे केले ठीय्या आंदोलन

37

✒️वरुड(पुरोगामी संदेश नेटवर्क)

वरुड(दि.9नोव्हेंबर):-अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेले शौचालयाचे अनुदान मिळण्यासाठी दिनांक 3 नोव्हेंबर 2020 रोजी युवा मित्र मंडळ पुसला तसेच लाभार्थी ग्रामस्थ पुसला यांनी तीन दिवसात अनुदान खात्यात जमा करण्यासाठी निवेदनाद्वारे अल्टिमेट दिले होते परंतु ग्रामपंचायत पुसला यांनी त्याची दखल घेतली नाही.

तरी आज दिनांक 9 नोव्हेंबर 2020 रोजी सोमवारला ग्रामपंचायत कार्यालय पुसला येथे युवा मित्र मंडळ पुसला तसेच लाभार्थी ग्रामस्थ यांनी ग्रामपंचायत कार्यालय पुसला येथे ग्रामसेवक साहेब यांच्या दालना मधे खाली बसुन अनुदान मिळण्यासाठी आश्वासन लेखी स्वरुपात घेईपर्यंत तीन तास सतत आंदोलन केले.

ग्राम विकास अधिकारी पुसला तसेच पोलीस प्रशासन यांच्या उपस्थितत 4 दिवसात अनुदानाची रक्कम थेट बँक खात्यात टाकण्याचे लेखी स्वरुपात आश्वासन पत्र ग्रामविकास अधिकारी पुसला यांनी दिले.

यावेळी आंदोलनात सहभागी युवा मित्र मंडळ पुसला अध्यक्ष सुरज धर्मे,संदीप बागडे,आनंदजी पाटील, आशिष श्रीराव,संजय श्रीराव,लोकमत पत्रकार गजानन नानोटकर,संजय बमनोटे,जावेद शेख,नितीन सावले, वीरेंद्र सोलंकी त्रिशूल दिवाण,रमेश शिरभाते, बिसन बागडे, विष्णू बागडे,महादेव ढोरे,मधुकर लेकुरवाळे,उमेश निमकर हे होते.