कुंडलवाडी व परिसरात तुरीचे पीक जोमात

67

🔹चांगल्या उत्पन्नाची अपेक्षा

🔸कीडरोग नियत्रंणाची काळजी घेण्याची गरज

✒️अशोक हाके(बिलोली,तालुका प्रतिनिधी)मो:-9970631332

कुंडलवाडी(दि.10नोव्हेंबर):-यावर्षी भरपूर पाऊस झाल्यामुळे पिकांना मुबलक पाणी मिळाले.पावसामुळे सोयाबीन पिकास फटका बसला मात्र,सध्या थंडी वाढत असुन तुरीचे पीक सध्या शहर व तालुक्यात सर्वत्र जोमात आहे. फुलोऱ्यात असलेल्या तुरीच्या पिकाच्या शेंगा भरण्याच्या अवस्थेत कीड रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यात यश आले तर मोठ्या प्रमाणात उत्पन्न होण्याची अपेक्षा निर्माण झाली आहे.

यावर्षी चांगलाच पाऊस सुरू होता.त्यामुळे पिके वाया जातात की काय अशी भीती निर्माण झाली होती. परंतु, पावसाने विश्रांती घेतली अन्यथा शेतकऱ्यांत धीर आला.पावसामुळे सोयाबीनचे नुकसान झाले, इतर पिकांचे देखील नुकसान होते की काय अशी भीती शेतकऱ्यांत होती.मात्र पावसाने उघडीप दिल्याने पिकावरील आशा अद्याप कायम आहेत. आता थंडीला सुरुवात झाली. तेव्हा शेतातील तूर पीक चांगल्या स्थितीत असून,यंदा तूर पिकाची चांगली वाढ होईल व उत्पन्न चांगले मिळेल,अशी आशा शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.

सध्या स्वातंत्र्य व आंतरपीके म्हणून घेतलेले तुरीचे पीक सर्वत्र फुलोऱ्यात आहे. हे तुरीचे पीक जोमात असल्याने चांगले उत्पादन होऊन सोयाबीन व कापूस पिकाच्या झालेली नुकसानीची भरपाईस हातभार लागण्याची आशा बळावली आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना भविष्यात येणाऱ्या कीड रोग नियत्रंणासाठी कीटकनाशक फवारणी वेळेत करून घेण्याची आवश्यकता आहे. त्यानंतर उत्पादीत झालेल्या तुरीला बाजारपेठेत चांगला भाव मिळाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक मदत होईल असे सध्यातरी चित्र असल्याचे दिसून येत आहे.