पक्षी सप्ताहाच्या पार्श्वभुमीवर वाण प्रकल्प परिसरात पक्ष्यांचे निरीक्षण

64

✒️अतुल बडे(परळी प्रतिनिधी)मो:-9096040405

परळी(दि.10नोव्हेंबर):-पक्षी सप्ताह पार्श्वभूमीवर परळी शहरानजिक असलेल्या नागापूर येथील वाण प्रकल्पावर पक्षी निरीक्षण कार्यक्रम पार पडला. देशी-विदेशी अशा विविध पक्ष्यांची ओळख करुन घेण्यासोबत पक्षीप्रेम वाढविण्यासाठी विशेष मार्गदर्शन करण्यात आले.

वन परिक्षेत्र परळीच्या वतीने पक्षी सप्ताहाच्या निमित्ताने नागापूर येथील वाण प्रकल्प क्षेत्रात पक्ष्यांविषयी जनजागृती व आवड निर्माण करण्याच्या पार्श्वभुमीवर आज निरीक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. साधारणपणे 35 ते 40 पक्ष्यांची गणना व ओळख आज करण्यात आली. राखी, मोरहून, गुलाबी मैना, माऊमुनिया, पठाणी, सूर्यपक्षी, गरुड अशा प्रकारच्या पक्ष्यांची ओळख, गणना आज करण्यात आली.

सकाळी 6 वा.पासून हा कार्यक्रम सुरु झाला. यावेळी वन परिक्षेत्र अधिकारी बी.एस.गित्ते, पक्षी मित्र हेमंत धानुरकर, सौ. तारका वानखेडे, वनपाल राठोड, वनरक्षक व्ही.एम.दौंड, पी.व्ही.सोळंके, अद्वेत गित्ते व भगवान शेप उपस्थित होते.