राष्ट्रसंत विचार साहित्य परिषदेच्या वतीने आॕनलाईन प्रबोधन सप्ताह संपन्न

27

🔸राष्ट्रसंतांनी ग्रामोध्दाराचा विचार दिला – डाॕ. किसन पाटील

✒️चंद्रपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

चंद्रपूर(दि.10नोव्हेंबर):-राष्ट्रसंत श्रीतुकडोजी महाराजांनी माणूसपणाचे, पर्यायाने धर्मपंथ विरहित मानवी मुल्यांचे साहित्य दिले . तसेच ह्या साहित्याच्या माध्यमातून देशहितादृष्टीने ग्रामसुराज्याचा विचार दिला, असे प्रतिपादन जळगाव चे सुप्रसिद्ध साहित्यिक डाॕ.किसन पाटील यांनी केले.

वं. राष्ट्रसंत श्रीतुकडोजी महाराजांच्या ५२ व्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने यावर्षी राष्ट्रसंत विचार साहित्य परिषद केंद्रीय समितीच्या वतीने आॕनलाईन प्रबोधन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. शासनाचे निर्देश पाळत सामाजिक अंतर ठेवून प्रबोधनासोबतच शाखास्तरावर कृतीशील कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते . विविध शाखेतर्फे स्वच्छता अभियान , भजन गीत व श्लोक गायन , प्रतिमा पुजन व मौन श्रध्दाजंली आदी कृतीशील कार्यक्रमात सर्वाचा सहभाग महत्त्वाचा होता. उदघाटनपर भाषण ज्येष्ठ लेखिका डाॕ. प्रतिमा इंगोले (अकोला ) यांनी केले.

त्या आपल्या भाषणात म्हणाल्या , राष्ट्रसंतानी जन्म घेऊन व-हाडच्या मातीला धन्य केले आहे.तसेच आपल्या व्यापक जनउध्दाराच्या कार्याने सुध्दा उपकृत केलेले आहे.त्यांनी आपले जीवन जनकल्याणासाठी वेचले. त्यांना आलेल्या अनुभवातून सिध्द झालेले नवनीतरूपी काव्य म्हणजे ग्रामगीता आहे. त्या ग्रंथातील एक तरी ओवी प्रत्येकांनी आचरणात आणावी , असे आवाहन त्यांनी केले. प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ साहित्यिक ॲड.लखनसिंह कटरे( गोंदिया ), सिआरपीएफ कमांडर डाॕ. चेतन शेलोटकर , डाॕ. शिवनाथजी कुंभारे( गडचिरोली ) , संजय तिळसम्रूतकर( तेलगांना ), डाॕ.नवलाजी मुळे (अड्याळ टेकडी )आदी मान्यवर उपस्थित होते.

सोशल मिडीयाच्या माध्यमातून वेगवेगळ्या ग्रुपवर हा कार्यक्रम शेअर केल्याने अनेक लोकांपर्यत वं. राष्ट्रसंताचे मानवतावादी , परिवर्तनवादी विचार पोहचविण्यास मदत झाली. तसेच गावागावात स्वच्छतेचे कार्य झाले .ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर यांच्या संकल्पनेतून व्हॕट्सॲप आणि फेसबुकच्या माध्यमातून राष्ट्रसंताच्या विचारांचा प्रचार प्रसार करण्याच्या दृष्टीने विविध उपक्रमाचे नियोजन करण्यात आले होते.

महिलासाठी घेण्यात आलेल्या राष्ट्रसंत रचित भजन गायन कार्यक्रमात सौ.रजनी बोढेकर चंद्रपूर , अँड.सारिका जेनेकर राजुरा, कु.प्रगती जेनेकर , सौ.नलिनी लांडे सास्ती, सौ.सुवर्णा कावळे अंतरगाव, श्रीमती वृंदाबाई काकडे चिंचाळा, कु.गौरी मोहनदास चोरे , कु.अनुश्री चोरे नागपूर, सौ.योगीता कोंडेकर ऊर्जानगर , कु.केतकी कावळे अंतरगाव , कु.ऋतुजा कोंडेकर ऊर्जानगर , कु.अनिषा पावडे राजुरा , श्रीमती अनुसया बोबडे पंचाळा , सौ.राजश्री राजुरकर सास्ती , सौ.अरुणा चौधरी रामपूर , सौ. संध्या मत्ते राजुरा ,सौ.अल्का ढोबे, भालर ता.वणी यांनी भाग घेतला तर माझे घर- माझे गाव परिसर स्वच्छता उपक्रमात ऋग्वेद कोंडेकर ऊर्जानगर , देवराव कोंडेकर , ॲड.राजेंद्र जेनेकर , विश्र्वास सूर परसोडी , उमंग संजय वैद्य , संजय वैद्य ,अनिवाळू सर , मोहनदास चोरे , नामदेवराव पिज्दूरकर, गुरुदेव सेवा मंडळ ऊर्जानगर च्या सेवकांनी सहभाग नोंदविला.
ग्रामगीता ओवी वाचन व विश्लेषण उपक्रमात चेतन ठाकरे आरमोरी , कुणाल पिजदुरकर मुल , लटारु मत्ते, ॲड.सारीका जेनेकर, शैलेश नानाजी कावळे , कु.प्रगती जेनेकर, अनिलराव चौधरी आदींनी उत्स्फुर्त सहभाग नोंदविला.

राष्ट्रसंत रचित श्लोक गायन उपक्रमात कु.सिद्धी मेश्राम , कु.प्रगती जेनेकर ,कु.अनुश्री चोरे ,कु.केतकी कावळे ,ऋग्वेद कोंडेकर ,कु.ऋतुजा कोंडेकर ,चैतन्य जेनेकर ,प्रणय पासपुते, साहिल लोहे आदी सहभागी झाले होते.

आॕनलाईन सप्ताहात झालेल्या सामुदायिक ध्यान व प्रार्थना प्रसंगी आत्माराम आंबोरकर गडचांदूर श्री.प्रेमदास मेंढुलकर सिंदेवाही , डॉ.शिवनाथ कुंभारे, प्रा. अशोक चरडे , सयाम गुरूजी ,डॉ.नवलाजी मुळे अड्याळटेकडी ,नामदेव पिज्दुरकर मुल ,कार्तीक चरडे चंद्रपूर , प्रा.श्रावण बानासुरे बल्लारपूर , सौ.मंजुषा कऊटकर नागपूर आदींनी विचार प्रस्तुत केले तर ग्रामगीता ग्रंथावर चिंतन प्राचार्य विजय मार्कंडेवार , विलास निंबोरकर,गडचिरोली , डॉ.किसन पाटील जळगाव ,ॲड.सारीका जेनेकर बासरी वादक पालिकचंद बिसने भंडारा, डॉ.प्रतिमा इंगोले,अकोला ,प्रभाकर नवघरे,सांगडी, भाऊराव पत्रे,कोंढाळा
तेलंगानाचे संजय तिळसमृतकर,सिआरएफचे चेतन शेलोटकर , ॲड.लखनसिंह कटरे यांनी विचार मांडले.

सप्तखंजेरीवादक भाऊ थुटे यांची प्रकट मुलाखत घेण्यात आली. तसेच वणी येथील उदयपाल महाराज यांच्या सप्तखंजेरी कीर्तनाने सप्ताहाची सांगता करण्यात आली. सूत्र संचालन ॲड. राजेंद्र जेनेकर , सुनिल नाथे, महेंद्र दोनोडे आदींनी व्यवस्थितपणे सांभाळले.