ओबीसीच्या हक्कांचं संरक्षण न करणारे मंत्रिमंडळात का आहेत – ॲड. प्रकाश आंबेडकर

33

✒️समाधान गायकवाड(विशेष प्रतिनिधी)मो:-8552862697

अकोला(दि.11नोव्हेंबर):- मराठा तसेच सवर्णांना जे आरक्षण देण्यात आले आहे त्याची पूर्ण फि शासन भरेल, त्याची सर्व जबाबदारी शासनाने घेतली आहे तर ओबीसीच्या विद्यार्थ्यबहिमिलियर व नॉन क्रिमिलियर अशी चाळण अगोदरच शासनाने लावली आहे. क्रिमिलियरला आरक्षण देत नाही तर नॉन क्रिमिलियरला आरक्षण दिले जाते. त्याचे कारण तो गरीब आहे.

एका गरीबाची फी आपण माफ करीत असाल तर इतरांचे काय?महाराष्ट्रातील जेवढे ओबीसीचे मंत्री आहेत त्यांनी ९ ऑक्टोबर २०२० रोजी जो जीआर काढला आहे त्या जीआर मध्ये आपण ओबीसीला का समाविष्ट केले नाही असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.

आपण ओबीसीचे मंत्री असूनही ही आपण ओबीसीच्या हक्कांचं संरक्षण करू शकत नाही तर आपण मंत्रिमंडळात का आहात याचा खुलासा करावा, अशी विनंती राज्यातील सर्व ओबीसीच्या मंत्र्यांना करण्यात येत असून ते खुलासा करतील अशी अपेक्षा ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली आहे. अशी माहिती वंचितचे राज्य प्रसिद्धी प्रमुख सुरेश नंदिरे यांनी दिली.