प्रवाशांसाठी मनसे चा एक नवा प्रयत्न

28

🔹मनसे तालुका उपाध्यक्ष रोशन लोखंडे यांचे जुने तिकीट दर देण्याचे आवाहन

✒️वरुड(पुरोगामी संदेश नेटवर्क)

वरुड(दि.12नोव्हेंबर):-आज रोजी करोना प्रादुर्भावामुळे जे आटो ची टिकीट वाढवण्यात आली होती 25 रुपया वरून 50 रुपये तिकीट कमी करण्यात यावी याबाबत उद्याला बेनोडा वरुड शेंदुर्जना घाट पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात येत आहे व दोन दिवसाच्या आत जर त्यांनी या गोष्टीची दखल घेतली नाही तर पोलिसांनी तीव्र आंदोलन मनसे तर्फे करण्यात येईल.

कारण हा फटका सर्वसामान्य लोकांना बसत आहे जे दररोज वरुड ते लोणी व तसेच वरुड तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये सर्व ठिकाणच्या आटो ची तिकीट वाढलेले आहेत हे सर्व कमी करण्यात यावी म्हणून निवेदन देण्यात आलेले आहे . रोशन लोखंडे यांनी ऑटो युनियन व स्थानिक पोलीस प्रशासनाला निवेदनाच्या स्वरूपात तिकिटाचे दर कमी करण्याचे आवाहन केले असून अन्यथा तीव्र आंदोलन मनसे तर्फे छडले जाईल.

यावेळी सचिन डांगे , प्रजवल मानेकर , अक्षय पोहरकर , पवन गुल्हाणे , सैजत शेख, सागर विघे , रुजेश विघे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते