जनगणनेत ओ बि सी कॉलम समाविष्ठ करा

29

🔸भावसार समाजाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

✒️चंद्रपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

चंद्रपूर(दि.12नोव्हेंबर):-संविधानाने ओ बि सी ना हक्क दिलेला आहे आम्हाला भीक नको शासन दरबारी डावलण्याचा प्रकार घडत आहे 2021च्या जनगणनेत ओ बि सी कॉलम समाविष्ट करण्यात यावा या करिता भावसार युवा एकता महिला आघाडी चंद्रपूर व ओ बि सी ऑर्गनाइझेशन इंडिया चंद्रपूर च्या वतीने मा जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.

आम्हाला आमचे हक्क हवे कुणाच्या हक्कावर घाला घालणार नाही संविधानाने सर्व प्रवर्गाची परिसीमा आखली आहे त्यानुसार आम्हाला हक्क मिळायलाच पाहिजे परंतु 2021 च्या जनगणनेत ओ बी सी कॉलम वगळून शासनाने अन्याय केला आहे.देशात ओ बि सी जातींची संख्या 3743 आहे 1932 पासून आजपर्यंत कोणत्याही सरकारने जनगणना केलेली नाही.भारतीय संविधानात 340 कलमानुसार देशातील ओ बि सी समाजाच्या कल्याणाची सोय केलेली आहे.

परंतु 1913 पासून कोणत्याही सरकारला ओ बि सी च्या कल्याणाची गरज वाटली नाही.राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील आरक्षणाचे प्रमाण एक समान असावे.53 टक्के इतर मागास प्रवर्ग असतांना स्वतंत्र जनगणना प्रपत्रात रकाना का नाही? ओ बि सी ची संख्या माहीत होण्या करिता 2021 च्या जनगणनेत ओ बि सी जनगणना व्हायलाच पाहिजे.अन्यथा ओ बि सी लढा अविरत सुरू राहील.गावा गावात सभा घेऊन जनजागरण करण्यात यावी आम्हाला मराठा समाजाच्या आरक्षणाचा विरोध नाही परंतु मराठा समाजाचा इतर मागास प्रवर्गात समावेश करू नये.

असे झाल्यास ओ बि सी समाजावर अन्याय होईल.बिहार राज्याने जातीनिहाय जनगणनेचा ठराव घेतला आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट राज्य सरकारनें निर्णय का घेऊ नये.जो पर्यंत जनगणना 2021 मध्ये ओ बि सी चा कॉलम नाही तो पर्यंत आमचा जनगणनेत सहभाग नाही.आम्ही सर्व ओ बि सी प्रवर्गना आग्रहाची विनंती करतो की त्यांनी आपले मतभेद व मनभेद दूर सारून एकत्र येऊन लढा द्यावा.व 26 नोव्हेंबर 2020 च्या विशाल मोर्च्यांत सामील व्हा.असे झाल्यास विजय निश्चित आहे.असे आवाहन भावसार युवा एकता महिला आघाडी चंद्रपूर व ओ बि सी ऑर्गनायझेशन इंडिया,चंद्रपूर ने केले आहे.

शिष्टमंडळात अभिलाषा मैंदळकर,छाया बरडे, प्रीती लाखदिवे,मीनाक्षी अलोने, कांता दखणे,राजश्री क्षीरसागर,मीनाक्षी करिये,कमल अलोने,हेमांगी साधनकर, योगिता धनेवार,वैशाली भागवत,रंजिता वांढरे,वैशाली जोगी,संगीता गणफाडे,सुनंदा वांढरे आदींची उपस्थिती होती.