दीपावली

22

दिवाळी हा प्रकाशाचा सण. अंधःकारमय दुनियेत प्रकाशमय वातावरणाने प्रफुल्लित होण्याचा तो एक दीपमय सण. परंतु ह्या वर्षी कोरोना सारख्या माहामारीने संपुर्ण विश्व संकटात असताना ह्या दिवाळी ह्या सणावार खुप मोठं संकटाच सावट आहे. दिवाळी हा अत्यंत आनंद देणारा सण दीपावली म्हणून सुद्धा ओळखला जातो. हा सण भारतात नव्हे तर इतर देशातसुद्धा प्रसिद्ध आहे. दिवाळी हा सण इतर सणांपेक्षा वेगळा आहे, त्याच हेच कारण आहे. या सणात आकाशातले तारे पृथ्वीवर येतात, अशी कविकल्पना आहे.

आश्विन महिन्यातील शेवटचे तीन दिवस आणि कार्तिक महिन्यातील पहिले दोन दिवस असा पाच दिवसांचा दिवाळीचा उत्सव असतो. शरद ऋतूच्या मध्यभागी येणार हा दीपोत्सव. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत सर्वत्र उत्साहाने साजरा केला जातो. वर्षभरात केले जात नाहीत इतके तिखट-गोड पदार्थ या दिवशी केले जातात. आकाश कंदिलामुळे घराला एक वेगळीच शोभा येते. मित्र नातेवाईक यांचा भेटण्याचा, शुभेच्छा देण्याचा या काळ असतो. अशा या दिवाळीचे पाच दिवसही कमी पडताहेत असे वाटते.

धनत्रयोदशी पहिला दिवस धनत्रयोदशीच्या असतो. या दिवशी घरातील लक्ष्मीची पूजा केली जाते. घरातील मोठे व्यक्ती त्या दिवशी संध्याकाळी अंघोळ करून, एका तबकात काही रुपये ठेवून त्याची पूजा करते. धणे-गुळाचा नैवेद्य दाखवला जातो व दिवाळीचे गोड पदार्थ प्रसाद म्हणून वाटले जातात. या दिवशी अशा प्रकारे पूजा केल्याने लक्ष्मी प्रसन्न होते.

नरक चतुर्दशी दुसरा दिवस हा नरक चतुर्दशीच्या असतो. या दिवसाला दिवाळीच्या पाच दिवसात खूपच महत्व आहे. काही लोक याच दिवसाला दिवाळीचा पहिला दिवस मानतात. या दिवशी श्रीकृष्णाने नरकासुर नावाच्या एका राक्षसाचा वध केला होता . नरकासुर हा एक दुष्ट प्रवृत्तीचा राक्षस होता. त्याने सोळा हजार मुलींना बंदिस्त करून ठेवले होते. त्या मुलींचे पालक या प्रसंगाने घाबरले. त्यांनी श्रीकृष्णाची भेट घेऊन, त्याला आपले दुःख सांगितले. या घटनेमुळे श्रीकृष्णाला पालकांची दया आली. त्यांचे दुःख दूर करण्याची जबाबदारी त्याने घेतली.

नरकासुराचं आणि श्रीकृष्णाचं युद्ध झालं. श्रीकृष्णाने नरकासुराचा वाढ केला व सर्व मुलींची सुटका केली. आपल्या मुलींना सुखरूप पाहून पालक आनंदले व नरकासुराच्या वाढणे सारे संकट टळले. हि घटना आश्विन वद्य चतुर्दशीला घडली. या घटनेची आठवण म्हणून या दिवसाला नरक चतुर्दशी असे नाव आहे.

लक्ष्मीपूजन तिसरा अमावास्येचा दिवस हा लक्ष्मीपूजनाचा असतो. व्यापार मंडळींसाठी हा दिवस फार महत्वाचा असतो. या दिवशी ते दुकानात लक्ष्मीपूजन करतात. प्रसाद म्हणून सालीच्या लाह्या व बत्तासे वाटले जातात. काही लोकांत घरातसुद्धा लक्ष्मीपूजन करतात. लक्ष्मीपूजन झाल्यावर मोठ्या प्रमाणात फटाके फोडले जातात जे हळूहळू पर्यावरणाला वाचवण्यासाठी कमी होत चालले आहेत.

बलिप्रतिपदा चौथा दिवस हा बलिप्रतिपदेच्या असतो. गुढीपाढवा हिंदू धर्मियांचा पहिला दिवस त्याचप्रमाणे बलिप्रतिपदा किंवा पाडवा हा व्यापारांतील पहिला दिवस. फार पूर्वी बाली नावाचा राजा होता. तो अत्यंत उदार व धर्मप्रिय होता. त्याने अनेक यज्ञ केले. त्यामुळे त्याची प्रतिकारशक्ती वाढली. देवांनाही भीती वाटू लागली. जर त्याने स्वर्गावर विजय मिळवला तर ? असा प्रश्न देवांना पडला व विष्णूकडे गेले. विष्णूने त्यांची अडचण समजावून घेतली व अत्यंत चलाखीने कट रचला. विष्णूने बटु वामनाचे रूप धारण केले व यज्ञ चालू असताना बलिराजाकडे गेला.

यज्ञाचे वेळी ब्राम्हण आल्यामुळे राजा खुश झाला. बलिराजाने त्याला विचारले, “काय हवं असेल ते माग !” त्यावर बटु वामनरूपी विष्णूने उत्तर दिले कि, “मला फक्त तीन पावले जमीन दे. ” बलिराजाने ताबडतोब मागणं मान्य केलं. नंतर बटू वामनाने आपले खरे रूप धारण केले. दोन पावलांत पृथ्वी व आकाश व्यापून टाकले व विचारले, “आता तिसरं पाऊल कुठे टाकू ?” बलिराजाला देवाची युक्ती समजली व त्याने विष्णुपुढे आपलं मस्तक टेकलं. विष्णूने आपल्या पायाने बलिराजाला जमिनीत खूप खाली पाठवून, पाताळाच राज्य दिल. त्यामुळे देवांची काळजी दूर झाली. हा दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ दिवस मानला जातो.

भाऊबीज भाऊबीज हा दिवाळीचा शेवटचा दिवस. या दिवशी बहीण आपल्या भावाला ओवाळते व भाऊ आपल्या बहिणीला ओवाळणी म्हणून बक्षीस देतो. या दिवशी यमसुद्धा आपल्या बहिणीला भेटावयास तिच्या घरी जातो. दिवाळी हा सण सर्वात मोठा सण मानला जातो. दिवाळी या सणामध्ये अनेक नवनवीन कार्यक्रम घेतले जातात जसे की दिवाळी पहाट , काव्य मैफिली, हे नवीन कार्यक्रम आपल्याला दिवाळी दिवशी पहायला मिळतात. आशा पध्दतीने दिवाळी साजरी केली जाते.
आपणास व आपल्या परीवारास दीपावलीच्या खुप खुप शुभेच्छा

✒️लेखक:-गजानन साबळे (मु.पो.कासारवाडी
ता.परळी वैजनाथ,जि.बीड)मो:-७०३८५४५४६१