पुसद येथे बीड जिल्ह्याचे कारागृह अधीक्षक संजय कांबळे यांना आदरांजली

31

🔸भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा पुसदच्या वतीने आयोजन

🔹पुसद तालुक्यातील विविध राजकीय विविध सामाजिक संघटनाचा सहभाग

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)मो:-7875157855

पुसद(दि.13नोव्हेंबर):-दहशतवादी कसाबची जेलमध्ये निगराणी करण्याची जबाबदारी पार पडल्यामुळे राष्ट्रपती पदकाचे मानकरी ठरलेले तुरुंगाधिकारी संजय कांबळे यांचे कोरोणामुळे ३/११/२०२० रोजी बीड येथे दुःखद निधन झाले.

व दिनांक१२/११/२०२० रोजी त्यांच्या पुण्यानुमोदनाचा कार्यक्रम त्यानिमित्त पुसद येथे भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा पुसद यांनी आदरांजलीपर कार्यक्रमाचे आयोजन पुसद तहसील कार्यालय समोरील हुतात्मा स्मारकाजवळ केले होते.

यावेळी पुसद तहसिलदार गीते साहेब ,पुसद शहराचे ठाणेदार पांडुरंगजी फाडे, जय जवान माजी सैनिक असोसिएशनचे अध्यक्ष माजी सैनिक प्रकाश भोसले ,माजी सैनिक आलमगीर खान, माजी सैनिक डी .जी .कांबळे ,माजी सैनिक अमोल भालेराव, माजी सैनिक धम्मपाल पडघणे, माजी सैनिक संजय राठोड,भारतीय बौद्ध महासभा तालुकाध्यक्ष माजी सैनिक भारत कांबळे, विश्वासराव भवरे, बाळासाहेब वाठोरे, बाबाराव उबाळे, ल.पु.कांबळे,सुरज हाडसे, यादव हाटे, परमेश्वर खंदारे, बुद्धरत्न भालेराव ,धनराज कांबळे, अशोक भालेराव, प्रा. जनार्दन गजभिये इत्यादी मान्यवर उपस्थित होते .या उपस्थित मान्यवरांनी तुरुंगाधिकारी स्मृतीशेष संजय कांबळे यांच्या प्रतिमेचे पुष्प,धुपाने पूजन करण्यात आले.

यावेळी शिलानंदजी कांबळे यांनी तुरुंगाधिकारी स्मृतीशेष संजय कांबळे यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला .त्यानंतर सर्वांनी दोन मिनिटे शांत उभे राहून आदरांजली वाहण्यात आली .

त्यानंतर उपस्थित संतोष सोनोने, किसन धुळे ,भगवान खंदारे , विनोद कांबळे, सरस्वती पडघणे,सुनिता कांबळे, आकाश धुळे ,विक्रांत डाके, प्रभाकर भालेराव ,श्याम देवकुळे , मंगेश पाईकराव ,आदित्य राठोड ,अजय राठोड,ह.भ.प.अजिंक्य महाराज पुलाते , रवि लांडगे , कुंदन कांबळे तसेच विविध राजकीय, विविध सामाजिक संघटनेच्या आणि उपासक-उपासिका यांनी स्मृतीशेष संजय कांबळे यांच्या प्रतिमेस पुष्प वाहिले . या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बौद्धाचार्य तुकाराम चौरे यांनी केले .तर आभार प्रल्हाद खडसे यांनी मानले.