स्नेहलोक फाउंडेशनच्या वतीने राज्यस्तरीय गुणगौरव पुरस्कार वितरण सोहळा

33

🔹कोरोना विरुद्धच्या युद्धात जीवाची बाजी लावून काम करणाऱ्या योद्ध्यांना सलाम – आमदार ऋतुराज पाटील

✒️कोल्हापूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

कोल्हापूर(दि.14नोव्हेंबर):-मार्च महिन्यामध्ये भारतात दाखल झालेल्या कोरोना संकटामुळे सर्वांना बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागला. अशावेळी जीवाची बाजी लावून कोरोना विरुद्धच्या लढाईत आपले सर्वोत्कृष्ट योगदान देणाऱ्या कोरोना योद्ध्यांच्या कार्याला आपला सलाम आहे. सध्या जरी कोरोना पेशंटचे प्रमाण कमी होत असले तरीही तज्ञांच्या अंदाजाप्रमाणे दुसरी लाट आल्यास असेच योगदान द्यावे असे मत कोल्हापूर दक्षिणचे आमदार ऋतुराज पाटील यांनी गोकुळ शिरगाव येथे स्नेह लोक फाउंडेशनच्या वतीने राज्यस्तरीय गुणगौरव पुरस्कार वितरण सोहळ्यात बोलताना उद्गार काढले.

या कार्यक्रमांमध्ये आदर्श शिक्षक, संपादक, पत्रकार, प्रबोधनकार, शाहीर, उद्योजक, सरपंच, उपसरपंच, डॉक्टर अशा विविध क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. आंतरराष्ट्रीय ज्योतिष विशारद व स्नेह लोक फाउंडेशनच्या अध्यक्षा पंडीत मानसी यांच्या संकल्पनेतून हा भव्य गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सुशांत चव्हाण, कोजिमाशीचे चेअरमन प्रा. हिंदुराव पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

यावेळी गोशिमा चेअरमन श्रीकांत पोतणीस, उद्योजक अजित आजरी, प्रा. डॉ. स्मिता गिरी, अब्दुल मीरशिकारी ,शैलेंद्र पंडित , निखील प्रभू, पंडित अस्मी, मोहम्मद हसन शेख, प्रशांत भोसले उपस्थित होते तर कार्यक्रमाचे संयोजन डॉ. राजेंद्र सूर्यवंशी व पत्रकार महादेव वाघमोडे यांनी केले. सूत्रसंचालन सुभाष भोसले व प्रास्ताविक आणि आभार प्रा. तुकाराम पाटील यांनी केले.

यावेळी पुरस्कारप्राप्त मान्यवर सुमित्रा फराकटे(उद्योजिका पुरस्कार), सुरेश राठोड (उपसंपादक दै. जनमत, समन्वयक, सरपंच सेवा संघ पुणे विभाग) अमृत पाटील (उपसरपंच), वसुमती देसाई (पत्रकार), लतादेवी मांगले (आदर्श शिक्षिका) अनुराधा पोवर, नेहा पाटील,विजयमाला शिंदे, मेघा बागडी, वैशाली धबाले, सुनिता जाधव, महमदयासीन शेख,मारुती कानुरकर,अजित कांबळे, अन्वरपाशा देसाई, रामचंद्र घोलप, अमोल खरमाटे, राजाराम कांबळे, राजेंद्र सूर्यवंशी, प्रतीक्षा ठोंबरे, नंदकुमार ठोंबरे, अवधूत भाटये, अनिरुद्ध देशमुख,दिलीप शेटे, शाहीर सुरेश पाटील, नथुराम सावंत, शामराव सावंत, नामदेव उर्फ प्रताप मोरे, नामदेव पाटील, प्रमोदिनी माने, साक्षी पन्हाळकर यांचा पुरस्कार करण्यात आला.

याच बरोबर उत्तम कागले, संपादक, महादेव वाघमोडे, पत्रकार, राहुल राजगोळकर, सुभाष वायदंडे, सीमा सरवदे, अमित काकडे, पल्लवी मोहिते, विकास पाटील, प्रशांत भोसले, मेघा बांभोरीकर या मान्यवरांचा गोकुळ शिरगाव ता. करवीर येथे स्नेह लोक फाउंडेशनच्या वतीने आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. आणि अशा तऱ्हेने स्नेहलोक फाउंडेशनच्या वतीने राज्यस्तरीय गुणगौरव पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला.