ब्रम्हपुरीतील उदयकुमार पगाडे जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित

27

🔹बालक दिनाच्या पर्वावर ऑनलाइन पुरस्कार सोहळा संपन्न.

✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

ब्रम्हपुरी(दि.14नोव्हेंबर):- दि.१४ नोव्हेंबर २०२० रोजी शनिवारला आपल्या भारताचे प्रथम पंतप्रधान, प्रख्यात स्वतंत्र सेनानी, भारतरत्न “स्व.पंडित जवाहरलाल नेहरू” यांच्या जयंतीचा दिवस होता.. हा दिवस संपूर्ण भारतामध्ये “बालक दिन” म्हणून साजरा करण्यात येतो.

याच निमित्ताने कर्नाटक राज्यातील बँगलोर येथील प्रख्यात सामाजिक संस्था “गोल्डन केअर क्लब” च्या वतीने आपल्या भारतातील विविध क्षेत्रातील व्यक्तींना, त्यांच्या उत्कृष्ट कार्यशैलीबद्धल, नेहमी बालक दिनाच्या दिवशी विशिष्ट योग्यतेनुसार निवडक व्यक्तींना संस्थेमार्फत राष्ट्रीय पुरस्कार देण्यात येत असतो.. यावर्षी कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामूळे हा सोहळा ऑनलाइन स्वरूपात घेण्यात आला.

या ऑनलाइन राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यामध्ये बंगलोर_गोल्डन केअर क्लबचे संस्थापक श्री.के.सुधाकर आणि त्यांच्या निवड समितीने, आपल्या चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरीचे रहिवासी, मा.उदयकुमार सुरेश पगाडे (वय-२६) यांना, मागील ६ वर्षात अगदी कमी वयात समाजपयोगी लहान मोठी कामगिरी केल्याबद्धल “जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय पुरस्कार- २०२०” हा सन्मान देऊन, सुंदरसा प्रशस्तीपत्र व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.