पुसद येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त संगीतमय आदरांजली आयोजनाची बैठक

58

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)मो:-7875157855

पुसद(दि.15नोव्हेंबर):-डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ६ डिसेंबर रोजी महापरिनिर्वाण त्यानिमित्त त्यांना संगीतमय आदरांजली वाहण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र कलावंत न्याय हक्क समिती महाराष्ट्र राज्य यवतमाळ जिल्हा शाखा यांच्या वतीने करण्यात आले आहे .त्या नियोजनाची बैठक शशांक भरणे यांच्या निवास्थानी ग्रीन पार्क श्रीरामपूर पुसद येथे घेण्यात आली होती.

सर्वप्रथम तथागत गौतम बुद्ध व प. पू. डॉ.आंबेडकर या महामानवांच्या प्रतिमांचे पूजन करून व सामूहिक त्रिशरण पंचशील घेऊन बैठकीची सुरुवात करण्यात आली.त्यानंतर आदरांजलीचा संगीतमय कार्यक्रम हा श्रावस्ती नगर ( लक्ष्मी नगर ) येथील संबोधी बुद्ध विहार येथे दि. ६/१२/२०२० रोजी वेळ १२ वाजता राहील असे जिल्हाध्यक्ष प्रा.जनार्दन गजभिये यांनी कार्यक्रमाची रुपरेषा अशाप्रकारे राहील हे आणि उपस्थित मान्यवरांनी नियोजित केले.

यावेळी नागोराव कांबळे, ओमप्रकाश गवई , शशांक भरणे ,सुनील पाझरे ,संतोष गायकवाड, महेंद्र आघम ,प्रीती भरणे ,प्रा.प्रवीण राजहंस, कमलेश पाटील, धम्मदीप वाहूळे, मनोज खिराडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.या कार्यक्रमाकरिता सर्व समाज बांधवांनी तन-मन-धनाने सहकार्य करावे असे आव्हान महाराष्ट्र कलावंत न्याय हक्क समिती महाराष्ट्र राज्य यवतमाळ जिल्हा शाखाध्यक्ष प्रा. जनार्धन गजभिये यांनी केले.